April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेतकरी

हमाल व मापारी श्रमिक संघटनेने पुकारला दोन दिवस बंद

खामगांव : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी  तसेच कामगारां संदर्भातील विधेयकाविरोधात येत्या २६ व २७ नोव्हेंबरला देशातील सर्व शेतकरी व कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर हमाल मापारी महामंडळाची ऑनलाईन बैठक डॉ. बाबा आढाव यांचे उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली.या बैठकीत निर्णय घेण्यात आला.या आंदोलनात काम बंद ठेवून कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व कामगार सहभागी होणार आहेत.’केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांशी कोणतीच चर्चा न करता शेतकरी व कामगार विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे शेतकरी, कामगार, ग्राहकांना फटका बसणार आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात अनेक संघटना सहभागी होणार आहेत. त्याबाबतचे निवेदन बाजार समिती प्रशासक, आडते असोसिएशन, फूलबाजार आडते संघटना व खामगांव शहर पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे,’ अशी माहिती हमाल मापारी श्रमिक कामगार संघटनेचे सचिव दगडू सरदार यांनी दिली. बाजार समित्या बंद ठेवून, बाजार समिती, तहसील ऑफिस समोर शांततामय मार्गानी निदर्शने करण्यात येईल. या बंदला खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक श्री राजेश हेलोडे तथा संपूर्ण हमाल मापारी श्रमिक कामगार संघटना तर्फे पाठिंबा देण्यात आला आहे

Related posts

अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवल्याने दोघांविरुद्ध कारवाई

nirbhid swarajya

भंगाराच्या दुकानाला भीषण आग

nirbhid swarajya

सुप्रसिद्ध ‘एमडीएच’ मसालेचे संस्थापक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

nirbhid swarajya
error: Content is protected !!