November 21, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

ना.बच्चू कडू यांनी घेतले श्रींचे दर्शन व लोखंडा येथे दादासाहेब लोखंडकार यांची घेतली भेट

खामगांव : संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे ना.बच्चू कडू यांनी दर्शन घेतले. त्यानंतर संस्थांनचे विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची भेट घेऊन मंदिरातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली.यावेळी ना.बच्चू कडू यांच्यासोबत गजानन लोखंडकार हे प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर बच्चू कडू हे जालना येथे रवाना झाले. याच मार्गावर लोखंडा येथे जाऊन त्यांनी दादासाहेब लोखंडकार यांच्या निवासस्थानी भेट दिली व गजानन लोखंडकार गोपाल खंडारे, विजय इंगळे,देवेश लोखंडकार व लोखंडकार कुटुंबाकडून ना.बच्चू कडू यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाऊबीज म्हणून सौ. रूपालीताई इंगळे यांनी ना.बच्चू कडू यांचे औक्षण केले.यावेळी प्रहारचे गजानन लोखंडकार,निलेश सुल्ताने, सौरव देशमुख,गोपालभाऊ खंडारे,विजय इंगळे,आशीष सोनटक्के,अनंता नरवाड़े,देवेश लोखंडकार,यश मेतकर,समीर हाके,भारत हटकर, योगेश नवले दिवाकर पाटिल,अक्षय हातेकर,राहुल जोशी,हरीश सारसर,रामा बोरसे,संजय घेंगे,योगेश घोराडे,गणेश खंडारे,संदीप खंडारे,पंकज बावने,अमर देशमुख, अतुल ताकवाले,हितेश इटे,मयुर चिंडाले,संकेत टिकार,सुशांत टिकार,प्रकाश हिवराडे,विलास हरामकार,श्रीकृष्ण ठुट्टे,शक्ति ठाकुर आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस….

nirbhid swarajya

खामगांवमधे लव्ह जिहाद प्रकरण उघड़किस;खोटी ओळख सांगून केले लग्न

nirbhid swarajya

सरकारने तात्काळ प्रायव्हेट हॉस्पिटल ताब्यात घ्या- अशोक सोनोने

nirbhid swarajya
error: Content is protected !!