November 21, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

वंचितच्या जिल्ह्याध्यक्ष पदी गणेश चौकसे यांची निवड

खामगांव : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी घाटाखाली जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे त्यामध्ये खामगाव येथील गणेश चौकसे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रत्येक तालुक्यातून किमान पाच कार्यकर्त्यांचा समावेश करून कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे आदेशही अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहेत संपूर्ण जिल्ह्यातील शहर तालुका गणासाठी देखील नावे मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्याची सूचना सुद्धा करण्यात आली आहे. घाटाखाली जिल्हा कार्यकारणी मध्ये नियुक्ती केलेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष म्हणून विजय हाके संग्रामपूर,चंद्रभान कांबळे शेगाव,भगवान नांदुरा, विजय तायडे जळगाव, शंकरराव इंगळे जळगाव, यशवंत कळाशी मलकापूर, महासचिवपदी अँड.निखारे शेगाव,अतिश खराटे मलकापूर,सचिवपदी रत्नाकर भिलंगे संग्रामपूर, तुळशीराम वाघ मलकापूर, संजीव इंगळे संग्रामपूर, संघटक म्हणून भाऊराव उबाळे मलकापूर, सहसंघटक म्हणून आत्माराम वसूलकर संग्रामपूर, तसेच सदस्यांमध्ये मनोहर काळे,प्रकाश गवळी यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर यादी ही जिल्ह्यात पदनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता पक्षाने दिले ते काम निष्ठेने पार पाडले त्यांच्या कार्याची दखल पक्ष पातळीवर घेण्यात आली असून गणेश चौकशी यांच्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा या माध्यमातून सन्मान झाल्याचे बोलले जात आहे त्यांच्या निवडीमध्ये खामगाव मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पालकमत्र्यांची घोषणा…

nirbhid swarajya

कोरोना संसर्गाचा फटका टी-१ सी-१ या वाघालाही

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 241 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 55 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!