January 7, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव

एका दिवसात आठ हजार भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

मंदिर प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे भाविक गेले भारावून


दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कडून नियमांचे काटेकोरपणे पालन


सकाळी पाच ते रात्री आठ वाजे पर्यंत एका तासाला ५३५ याप्रमाणे एकूण आठ हजार भाविकांनी ई दर्शन पास द्वारे घेतले शिस्तबद्ध रीतीने श्रीं’चे दर्शन


शेगाव : तब्बल आठ महिन्यानंतर शेगाव येथील दर्शनासाठी खुले करण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आठ हजार भाविकांनी काल १७ नोव्हेंबर रोजी e दर्शन-pass द्वारे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत भक्ती भावपूर्ण वातावरणात श्रींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. विदर्भातील प्रति पंढरी म्हणून विख्यात असलेल्या व कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान शेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी १७ नोव्हेंबर पासून खुले होणार आहे या बातमीने मागील आठ महिन्यापासून श्रींच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेल्या ८००० भाविकांनी श्री संत गजानन महाराज संस्थान द्वारे जारी केलेल्या संकेतस्थळावर जाऊन तत्काळ दर्शन पास बनवून घेतल्या १७ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता पासून दर तासाला ५३५ याप्रमाणे रात्री आठ वाजेपर्यंत एकूण आठ हजार भाविकांनी श्रींचे दर्शन सोशल डिस्टंसिंग ठेवून तसेच सॅनेटरी चा वापर आणि शासनाने व श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने लावण्यात आलेल्या नियमांचा काटेकोरपणे पालन करत भक्ती भावपूर्ण वातावरणात श्रींच्या समाधीस्थळाचे व राम मंदिराचे दर्शन घेतले. श्री संत गजानन महाराज संस्थान प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभरीत्या श्रींचे दर्शन घेता यावे याकरिता अतिशय उत्कृष्ट अशी दर्शनाकरिता व्यवस्था केलेली होती.सहा फुटाचे अंतर प्रत्येक भाविकांमध्ये ठेवण्यात आलेले होते. एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही याकडे कटाक्षाने दक्षता घेण्यात येत होती पीण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर परिसरात उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलेली होती जेणेकरून कोणत्याही भाविकाला कुठेही स्पर्श करता येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती, याच प्रमाणे थोड्या-थोड्या अंतरावर सेनेट्राईज ची बॉटल घेऊन सेवाधारी आपली ड्युटी बजावत होते. श्रींच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या कोणत्याही भाविकाला हार फुल प्रसाद घेऊन जाण्याची मनाई करण्यात आलेली होती. संपूर्ण मंदिर परिसराचे वातावरण अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वाटत असल्याने भाविकांमध्ये एक वेगळाच आनंद उत्साह दिसून येत होता.ज्या भाविकांना ई पास काढण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या त्यांना योग्य मार्गदर्शन श्री संत गजानन महाराज संस्थान च्या नियुक्त केलेल्या मोबाईल क्रमांकावर करण्यात येत होते. बाहेर गावावरून आलेल्या व ज्या भाविकांनी ई दर्शन पास काढलेली आहे अशा भाविक भक्त यांना श्री गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित बाळापुर रोडवरील आनंद सागर विसावा आनंद सागर निवारा तसेच भक्तनिवास याठिकाणी थांबण्यासाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या.श्री संत गजानन महाराज संस्थान प्रशासनाच्या मंदिर परिसरात भाविकांसाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजन व्यवस्थेचे प्रत्येक भाविकाने मनापासून कौतुक केले.

Related posts

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू दुकानांमध्ये झडती सत्र

nirbhid swarajya

परप्रांतीय मजुरांना मारहाण करणारे दोन पोलीस कर्मचारी मुख्यालयी संलग्न

nirbhid swarajya

माँ जिजाऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाडी तर्फे शिक्षक दिनी वाडी परिसरातील सर्व शिक्षकांचा केला सन्मान …

nirbhid swarajya
error: Content is protected !!