November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा

गॅस लीकेजमुळे घरात आग; 3 जण गंभीर जखमी

खामगांव : येथील मस्तान चौक परिसरातील एका घरातले सिलेंडर लीकेज होऊन मोठी आग लागल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. येथील मस्तान चौक परिसरातील मो रफीक शे आमद यांच्या घरात गॅस चालू असताना अचानक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागल्याची घटना घटना घडली.

आग लागल्याने परिसरातील युवकांनी त्यांच्या घरात धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे त्या युवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सिलेंडरवर पोते टाकून विझवण्यात आली. या घटनेमध्ये घरातील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत .त्यांना उपचारांसाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यातील शे आमद शे बुरान वय 80,मो तौफीक मो रफीक वय 32,मो शफीक शेक आमद वय 45 तिघांना अकोला रेफर करण्यात आले आहे.

तर रुबीना अंजूम मो शफीक वय 35 यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असून त्यांची प्रकृती चांगली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. सदर आगीमधे घरातील सर्व विद्युत वाहिन्या दोन पंखे,एक वॉशिंग मशीन व किरकोळ साहित्य असा एकूण पाच ते सात हजाराचे नुकसान झाल्याची माहिती मो रफीक शे आमद यांनी दिली आहे.

Related posts

पती पत्नीच्या वादातून पती चढला तीनशे फूट उंच टॉवरवर…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 52 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 02 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

भारतीय जैन संघटना स्वीकारणार कोविड ग्रस्त अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व

nirbhid swarajya
error: Content is protected !!