खामगांव : आज २३ ऑक्टोबर रोजी शिवनेरी ग्रुप ला ५ वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्य शिवनेरी ग्रुपचे संघटन अधिक मजबुत करण्याकरीता गाव तेथे शाखा शाखा तेथे शिवनेरीचा कार्यकर्ता हे अभियान राबवत काळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शाखेचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणुन छत्रपती इन्स्टिट्यूट नागपुरचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील होते. या कार्यक्रमात चे प्रमुख उपस्थिती म्हणून गावातील सरपंचपती श्यामसुंदर गायगोळ हे होते.

या कार्यक्रमांमध्ये काळेगाव येथील गाव स्तरावर करोनो महामारी च्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा कोरोना योद्धा हे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी गावातील गावकरी मंडळी, तरुण मंडळी तसेच शिवनेरी ग्रुप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विरेंद्रसिंग इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदकिशोर ठाकरे यांनी केले.अशी माहिती शिवनेरी ग्रुप खामगाव व तालुक्याचे किशोर लोखंडे यांनी एक प्रसिद्धीपत्रद्वारे दिली.