November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

ट्रक अंगावरून गेल्याने ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू

खामगाव : स्थानिक कॉटन मार्केट परिसरात मजूरी करणारे शामराव पांडुरंग इंगळे (५५) हे आज २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झोपलेले असताना ट्रक क्र.एमएच२८-एबी-८२३८ च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून ट्रक रिव्हर्स घेत असताना त्यांच्या अंगावरुन नेला व त्यामधे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने शामराव इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बाजार समिति मधे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघात झाल्यावर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची महिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते तर घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पथविन्यात आले होते याप्रकरणी बेबीताई शामराव इंगळे यांनी शहर पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त ट्रक चालकाविरुध्द भादंवि कलम २७९, ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला.पुढील तपास पी एस आय सोळंके करीत आहे.

Related posts

घरकुलासाठी पारखेड येथील महिलांचा गट विकास अधिकारीनां घेराव..

nirbhid swarajya

आणिबाणी विरोधात लढणाऱ्या सत्याग्रहांमुळेच देशाला आज चांगले दिवस: आ.अँड फुंडकर

nirbhid swarajya

लॉकडाऊनला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा – प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने

nirbhid swarajya
error: Content is protected !!