January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

शिवाजी नगर पोलिसांनी केला गुटखा जप्त

खामगांव : महाराष्ट्रामधे गुटखा बंदी असतांना सुध्दा अवैध व्यवसायीक विविध मार्गाने प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यासह विविध नशिल्या पदार्थाची वाहतुक खामगांव मधे लपून छपून करीतच आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जगदंबा कॉलनी घाटपुरी येथील एका इसमाच्या घरातून ३३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे हे पोलीस स्टेशनमध्ये हजर असताना त्यांना माहिती मिळाली की,घाटपुरी येथील कृष्णा रामदास वडोदे यांनी त्यांच्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला अवैधरित्या गुटखा साठवून ठेवलेला आहे.

यावरून पोलिसांनी त्यांच्या घरि जाऊन त्यांना आवाज दिला असता त्यांचे नाव गाव विचारले व पोलिसांना घराची झडती घ्यायची असल्याचे सांगितले.पोलिसांनी सदर घराची झडती घेतली असता त्यांच्या घराच्या समोरच्या खोली मध्ये सोफ्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या साठवून ठेवलेला गुटखा अवैधरित्या ठेवलेला आढळला. पोलिसांनी सदर पोतड्या तपासणी केली असता त्यामध्ये २५८ पाकिटे विमल पान मसाला गुटखा चे किंमत ३० हजार ९६० रुपये व V-१ सुगंधित तंबाखू चे 100 पाकिटे किंमत ३ हजार रुपये असा एकूण ३३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. यावेळी पोलिसांनी अन्न व सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या आम्ही पुढील कारवाई करतो. तात्काळ पोलिसांनी त्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची सांगितले होते.

त्यानंतर काही वेळाने अन्न व औषधी प्रशासन अधिकारी रवींद्र सोळंकी यांनी फोन द्वारे पोलिसांची संपर्क केला असता त्यांना सांगितले की सदरची कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहे तसेच तुम्ही पुढील कारवाई करा असे त्यांनी कळविले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी कृष्णा रामदास वडोदे वय 40 राहणार जगदंबा कॉलनी, घाटपुरी याच्यावर अन्नपदार्थ बंदी कारवाई ६३३/२०१८/२०२० अन्वये त्याच्याविरुद्ध कलम १८८,२६९,२७०,२७२,२७३,४६८ भादवी तसेच सहकलम २६(२) (iv) ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा सहकलम ३ साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम ११ महाराष्ट्र covid-१९ उपाय योजना नियम २०२० प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पुढील कारवाई शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बारींगे करीत आहे. गेल्या तीन दिवसात हीच तीसरी कारवाई असून शहरात गुटखा येतोच कसा हा सुद्धा एक प्रश्नच निर्माण झाला आहे. नक्कीच याकडे नव्याने सुरू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया व खामगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Related posts

खामगांव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन

nirbhid swarajya

१२ बालकांवर सुसंस्काराचे धडे गिरविणारे माटर गाव चे श्री गुरुदेव सेवा मंडळ

nirbhid swarajya

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला

nirbhid swarajya
error: Content is protected !!