January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

कोतवालाला केलेल्या शिवीगाळाबद्दल कारवाई करण्याबाबतचे तहसीलदारांना निवेदन

खामगाव : बुलढाण्यातील मौजे भडगाव येथील तलाठी संजय जगताप यांनी कोतवाल विष्णू गायकवाड यांना फोनवरून शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, विष्णू गंगाधर गायकवाड हे कोतवाल म्हणून म्हसळा बु येथे काम करतात.

दि.१७-१०-२०२० रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास भड़गाव येथील तलाठी संजय विश्राम जगताप यांनी फोन करून योगेश राजाराम सपकाळ व सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांना गलिच्छ व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सदर शिवीगाळ ही त्यांनी वैयक्तिक कारणांवरून केली आहे. संजय जगताप भडगाव येथे तलाठी असून ते नेहमीच कोतवालांना त्रास देत असतात.तलाठ्यांच्या अश्या बोलल्यामुळे समाजामध्ये कोतवालांबद्दल हिन दर्जाची ओळख निर्माण होऊ शकते.

तसेच या सर्व घटनेमुळे सर्व कोतवालांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी लवकरात लवकर या मुजोरखोर तलाठ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व आम्हाला न्याय देण्यात यावा असे कोतवाल संघटनेने केली आहे.यावेळी सचिन ठाकरे,विनायक लाहुडकर, शिवशंकर पारखेडे ,सुनील पारखडे, सुखदेव चांदणे, भाऊराव पाटोळे, सुनील जाधव, महेंद्र खोडके, सुधाकर इंगळे, बिपिन जाधव,संजय लोखंडकार,गजानन सोळंके, योगेश पांढरे आदी उपस्थित होते.

Related posts

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 198 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 28 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

सेविका व मदतनीस कामबंद आंदोलनावर ठाम; २० दिवसानंतरही शासनाकडून तोडगा निघेना…

nirbhid swarajya
error: Content is protected !!