December 14, 2025
क्रीडा खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

लॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली

खामगांव : कोरोनामुळे मागील ६ महिने देश ठप्प झाला आहे. देशभरात अनेक महिने लॉकडाऊन आहे. आता टप्प्याटप्प्याने अनलाॅक केले जात आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे सर्वांनाच संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत होते. या कालावधीत लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. अनेक नोकरदार मंडळी  ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे घरीच बसून काम करावे लागत असल्याने दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने आरोग्याच्या समस्या उद्भभवल्या आहेत. आता अनलाॅक झाल्याने लोकांनी आरोग्याकडं लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, जीम, हेल्थ क्लब बंद आहेत. त्यामुळे व्यायामाचा एक चांगला प्रकार लोकांनी निवडला आहे. तो म्हणजे सायकल चालवणे. सद्या दुचाकी, चारचाकी वापरण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे सायकल वापरण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र, लाॅकडाऊनमध्ये सायकल उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. अनलॉक सुरु झाल्यापासून दोन महिन्यांत देशभरात सायकलीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मे पासून जुलैपर्यंत जवळपास ३४ लाख सायकली विकल्या गेल्या आहेत. म्हणजे रोज ३७ हजार सायकलींची विक्री झाली. यातील एकट्या खामगाव मध्ये चार महिन्यांमध्ये ३६०० सायकलींची विक्री झाली आहे.

दरवर्षी महिन्याकाठी ३०० सायकली येथील राठी सायकल स्टोअर्स मधून विकल्या जात होत्या. मात्र कोरोनाच्या काळामध्ये ६०० सायकली महिन्याच्या विकल्या गेल्या आहेत.यामुळे हेच लक्षात येते की नागरिकांना कोरोनामुळे का होईना आपल्या आरोग्याची काळजी लागली आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी सायकलींचं उत्पादन होतं. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल उत्पादक देश आहे. संपूर्ण देशात सायकल उद्योगाशी संबंधित जवळपास ४ हजार युनिट्स आहेत. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक व युनिट्स लुधियानात आहेत. देशाच्या मागणीच्या जवळपास ९० टक्के उत्पादन करणार्‍या लुधियानाने या व्यवसायात १०० टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदविली आहे. गेल्या वर्षी याच  कालावधीच्या तुलनेत ही वाढ दुप्पट आहे. येथील ब्रॅण्डिंग सायकल कंपनींना नवीन सायकलची मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्राप्त होत आहेत.राठी सायकल स्टोअर्स चे संचालक राजेंद्र राठी यांनी सांगितलं की, 34 वर्षांत मी  सायकलच्या मागणीत एवढी तेजी पाहिली नाही. देशात सायकलींचे उत्पादन एप्रिलमध्ये साडे चार लाखांवर आणि त्यानंतर जूनमध्ये साडे आठ लाखांवर गेले आहे. जुलै अखेर हा आकडा ११ लाखांच्या पुढे गेला आहे. भारतीय सायकल उद्योग सध्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उद्योगांत २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

Related posts

COVID 19 टेस्टिंग लॅब आता खामगांवमधे

nirbhid swarajya

वंचितचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांचा वाढदिवस साजरा

nirbhid swarajya

राजगृहाबाहेर तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!