January 4, 2025
जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ संग्रामपूर

गावा गावात स्वाभिमानीच्या मुक्काम मोर्चाची जय्यत तयारी सुरु

जळगाव जा./संग्रामपुर : २१ ऑक्टोबर रोजी संग्रामपुर तहसिलवर होणाऱ्या मुक्काम मोर्चाची गावा गावातुन शेतकऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.जामोद येथे राम मंदिर येथिल सभागृहात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी प्रशांत डिक्कर,अंनता मानकर,समाधान धुर्डे यांनी मार्गदर्शन केले. ऐके काळी पानमळे साठी जामोद व सुनगाव या गावाची ओळख राज्यभर प्रसिध्द होती पंरतु लोकप्रतिनीधीच्या नाकर्तेपणामुळे सिंचनाचा अभाव निर्माण होउन जळगाव संग्रामपुर तालुक्यातिल पाणमळे संपुष्टात आणन्याचे पाप या नेत्यांनी केल्याचा आरोप प्रशांत डिक्कर यांनी वेळी केला. ज्यांनी डोहाळी प्रकल्प मोडित काढण्याचा डाव आखला तो डाव हाणुन पाडुन लवकरच शेतक-यांचे स्वप्न साकार करण्यासाठी डोहाळी प्रकल्प पुर्ण करुण पुन्हा पानमळे फुलवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करु असे डिक्कर यांनी या वेळी बोलतांना सांगीतले.

येत्या २१ ऑक्टोबरला संग्रामपुर तहसिलवर आपला हक्क मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहा असे आवाहन ही या बैठकितुन करण्यात आले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थीक खचुन गेला आहे. तोंडाशी आलेले पिके पुर्णपने खराब झाले. सोयाबिन,मुंग,उडिद,मका,सह ईतर पिकेही उध्दवस्त झाले आहेत. या पिकाची नुकसान भरपाई द्यावी व १००% पिक विमा मंजुर करा. अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफ झाले नाही त्या शेतकऱ्यांना कर्जातुन मुक्त करा. अनेक शेतकऱ्यांच्या दोन वर्षा पासुन मुसलिच्या फाईल जिल्हा कार्यालयात पडुन आहेत त्या शेतकऱ्यांचे मुसलीचे अनुदान बँक खात्यात जमा करा या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी संग्रामपुर तहसिलवर मुक्काम मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन या बैठकितुन केले आहे. या बैठकिला स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर, रोशन देशमुख,समाधान धुर्डे, तेजराव लोने,सुनिल अस्वार स्वप्नील भगत, अनिल दामधर, अनिल धर्मे, दीपक धूर्डे , महादेव काळपांडे, गजानन भगत, अनता ताडे, वैभव भगत शुभम कपले सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Related posts

जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या;खामगांव उपविभागीय अधिकारी पदी राजेंद्र जाधव

nirbhid swarajya

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु

nirbhid swarajya

स्वाब न देताच रिपोर्ट आला कोव्हिड पॉजिटिव्ह…

nirbhid swarajya
error: Content is protected !!