November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने पकडला 2 लाख 13 हजाराचा गुटखा; तीन आरोपी अटकेत

खामगांव : महाराष्ट्रामधे गुटखा बंदी असतांना सुध्दा अवैध व्यवसायीक विविध मार्गाने प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यासह विविध नशिल्या पदार्थाची वाहतुक लपून छपून करीतच आहे. नव्याने रुजु झालेले एसडीपीओ अमोल कोळी यांना गुप्त बातमीदार कडून खबर मिळाली की खामगाव वरून कंझाराकडे मालवाहक अँपे क्रमांक एम.एच.३२-बी-३६२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या विमल कंपनीचा गुटखा चा माल अवैधरित्या वाहतूक होणार आहे. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशान्वये पोलीस स्टाफने पंचायत सह बुलढाणा ते कंझारा रोडवर विजयलक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ सकाळी ९ वाजता नाकाबंदी केली असता मालवाहक मध्ये गुटका वाहतूक करताना मिळून आला.सदर पथकाने विजयलक्ष्मी पेट्रोलपंपा जवळ 12 लाख 13 हजाराचा गुटखा पकडला असून यामुळे अवैध गुटखा व्यवसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात हा गंभीर प्रकार घडल्याने संबंधीत यंत्रणांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.मिळालेल्या माहितीनुसार शासनाने प्रतिबंध केलेल्या मानवी आरोग्यास हानिकारक असलेला विमल गुटखा २२ पोते किंमत १,७८,८८०/- रु. व V-१ कंपनीची सुगंधीत तंबाखू २२ पोतडया तसेच मालवाहक अँपे ७०,०००/- असा एकूण २,८३,५१२ रु. माल जप्त केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून या प्रकरणी शेख शोएब शेख आसिफ वय २० रा. कंझारा, शेख अफसर शेख बुढन वय 46 रा. बर्डे प्लॉट, मो बाकिर शेख बुढन वय 35 रा कंझारा,यांना अटक करण्यात आली असून गुटखा व मालवाहु अँपे जप्त करण्यात आले आहे.लॉकडाऊन सुरु झाल्या पासून गुटखा विक्री जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातून महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात अवैध गुटख्याची वाहतुक होतेच कशी ? हा प्रश्न सुद्धा येथे उपस्थित होतो.सदर प्रकरणी स. पो. निरीक्षक रविंद्र लांडे यांच्या फिर्यादि वरून आरोपी विरुध्द ३४०/२०२० क,१८८,२६९,२७०,२७२,२७३ भादवी सह क.२६(२)(iv),५९(i)अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ ५१(ब),आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ सह कलम ११ महाराष्ट्र कोविड-१९उपाययोजना अधिनियम २०२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.अरविंद चावरिया यांचे आदेशाने, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. अमोल कोळी खामगांव यांचे सह पथकातील स.पो.नि. रविंद्र लांडे, पो.ना. सुधाकर धोरात, पो.ना. अमित चंदेल,शांताराम खाळपे, सचिन लोंढेकर यांनी केली आहे.गुटख्याची अवैध वाहतुक करणाऱ्यांचे यामुळे घाबे दणाणले असून पोलीसांच्या सतर्कतेने ही कामगिरी यशस्वी झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related posts

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी खामगांवात…

nirbhid swarajya

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० क्विंटल तांदूळ पकडला चार लाखांचा मुद्देमाल जप्तः दोघांविरोधात गुन्हा दाखल

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 330 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 67 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!