January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शिक्षण शेतकरी

टेलिकॉम कंपनीच्या विरोधात स्वाभिमानीचे टॉवर वर शोले स्टाईल आंदोलन

खामगांव : जिल्ह्यात टेलीकॉम कंपनीचे नेटवर्क सुरळीत नसल्यामुळे आज आज स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून अटाळी येथे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारिने थैमान घातले आहे.अशातच शासनाच्या निर्देशानुसार सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्या मध्येच सर्व विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जियो, एयरटेल, आयडिया, वोडाफोन बी.एस.एन.एल. कंपन्यांचे इंटरनेट नेटवर्क व टेलीकम्युनिकेशन नेटवर्क सातत्याने दोन – दोन, तीन – तीन तास बंद राहत असल्याने विद्यार्थी व ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. सदर कंपन्या ग्राहकांकडून सेवेसाठी प्रति महिना पैसे आकारतात पण सेवा दिवस – दिवसभर बंद असल्याने ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे.इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा बंद असल्याने अनेकांना वैद्यकीय मदत वेळेवर मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू असल्याने त्यांना ही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे. तसेच अनेकांना व्यवसायातही लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. सदर कंपन्या ग्राहकांची मोठी फसवणूक करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

तसेच इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे,या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे व सहकारी यांनी आज अटाळी येथील येथील INDUS कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तसेच खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे जियो कंपनीचे इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन टॉवर असून सदर टॉवर हे बेवारस सारखे आहे. तेथे कोणताही सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी नसतात. तसेच सदर टॉवर साठी स्वतंत्र विद्युत रोहित्र नसल्याने सदर टॉवरला वीज पुरवठा हा गावातील विद्युत रोहित्रावरून होत असल्या कारणामुळे गावकऱ्याना अंधारामध्ये रहाव लागत आहे व त्यामुळे टॉवरद्वारे देण्यात येणारी इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा कायम विस्कळीत असते. त्यामुळे सदर टॉवर द्वारे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी सदर कंपनीला आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे. जर आठ दिवसाच्या आत सदर कंपन्यांकडून ग्राहकांना सुरळीत सेवा न मिळाल्यास या विषयासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पद्धतीने आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी सांगितले.

Related posts

लॉकडाऊन मधे दिव्यांगांना मिळत आहे सक्षम आधार

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 330 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 67 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

खामगाव: पोलीस ‘दादा’चे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’! तीन गाड्यांना दिली धडक,वाहनांचे लाखोंचे नुकसान…

nirbhid swarajya
error: Content is protected !!