January 1, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे कामगार सेना मैदानात


चार ठिकाणी मनसे कामगार सेनेची स्थापना

खामगाव : पश्चित विदर्भातील अनेक कंपन्यांचे मालक, मॅनेजमेंट कामगारांसोबत मुजोरपध्दतीने वागत असून कामगारांचे शोषन करीत आहेत. शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने कामगारांवर अन्याय होत आहे. मुजोर मालकांना वठणीवर आणन्यासाठी महाराष्ट्र नवनिर्मान कामगार सेना मैदानात उतरली आहे. खामगावातही मनसे कामगार सेना युनियनची स्थापना करण्यात आली असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे कामगार सेना प्रयत्नरत राहणार असल्याचे प्रतिपादन कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी केले. १४ ऑक्टोंबर रोजी खामगाव शहरातील शिवांगी बेकर्स प्रा.लि., यश एंटप्राईजेस, एस.एन.पॅकेजींग प्रा.लि., तसेच डी.एम.एंटरप्राईजेस (घनकचरा व्यवस्थापन) मध्ये मनसे कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान मनसेच्या कामगार सेनेत उपरोक्त कंपन्यांमधील अनेक कामगारांनी प्रवेश घेतला व मनसे सहकार सरचिटणीस व शॅडो क्रिडा युवक कल्याण मंत्री विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनात अधिकृतरित्या सभासत्व स्विकारून मनसे कामगार सेनेची स्थापना केली. यावेळी उपरोक्त चारही कंपन्यांमध्ये मनसे कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरण अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे चिटणीस किर्तीकुमार शिंदे, सरचिटणीस गजानन राणे, कार्याध्यक्ष संतोष धुरी, उपाध्यक्ष राजेश उज्जेनकर, चिटणीस केतन नाईक, निलेश पाटील, उपचिटणीस अक्षय पनवेलकर, अक्षय परवडी, कार्यकारणी सदस्य विजय उबाळे मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष अशोक पाटील, तालुकाध्यक्ष जयराम सातव,शहर अध्यक्ष आनंद गायगोळ, आकाश वानखडे, आकाश परकाळे, सागर बावस्कर, प्रतिक लोखंडकार,आकाश पाटील, वैभव देशमुख,सागर हरसुले,संतोष पवार,यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून अनेक कामगार युनियन संघटना कामगारांना न्याय देण्यासाठी नेतृत्व करीत आहेत. मात्र कामगारांना योग्य वेतनवाढ आणि सुविधा देण्यात त्या कुचकामी ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मैदानात उरतली असून खामगावा युनियनची स्थापना करण्यात आली आहे. युनियन स्थापन झाल्यानंतर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेवर जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासनही यावेळी मनोज चव्हाण यांनी दिले. यामुळे कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. एसएनजी कंपनी प्रा.लि.कंपनीमधील कार्यकारणी मध्ये एकनाथ भातखेडे, संतोष मांडवेकर, लक्ष्मण बोंबटकार, सचिन मोरखडे, सदानंद टाले, किरण रिंगणे, रवि क्षिरसागर, तसेच यश एंटरप्राइजेस मध्ये प्रदिप निमकर्डे, प्रदिप खंडेराव, गणेश बुंदे, विरेंद्रसिंग बघेल, हंसराज पटले, गजानन इंगळे, विजय इटे यासह डीएम एंटरप्राईजेस व शिवांगी बेकर्स मधील कामगार सेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related posts

लौकिक घिवे याचा सायक्लोथान स्पर्धेत प्रथम क्रमांक

nirbhid swarajya

गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये 24 जून पासून NEET, JEE व MH-CET च्या क्रॉशकोर्सला प्रारंभ

nirbhid swarajya

निमकराळ येथे विज पडून दोघांचा मृत्यू,तर एक महिला गंभीर जखमी….

nirbhid swarajya
error: Content is protected !!