January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 193 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

159 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 230 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 193 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 68 तर रॅपिड टेस्टमधील 125 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 193 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे: बुलडाणा शहर :1, बुलडाणा तालुका : डोंगर खंडाळा 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : टेंभुर्णा 1, दे. राजा शहर :3, दे. राजा तालुका : नागणगाव 1, दे. मही 2, लोणार तालुका: रायगाव 1, जळगाव जामोद शहर :1, चिखली तालुका : दीवठाणा 1, मंगरूळ नवघरे 2, सिंदखेड राजा तालुका : साखरखेडा 1, केशव शिवणी 2, निमगाव वायाळ 3, नांदुरा शहर :10, नांदुरा तालुका: पोटळी 1, मलकापूर शहर: 2, मलकापुर तालुका : दुधलगाव 2, तसेच मूळ पत्ता जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान हाजी मलंग दर्ग्याजवळ, बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष व सवणा ता. चिखली येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 159 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली :18, चुनावाला हॉस्पिटल 23, मेहकर : 20, सिंदखेड राजा : 21, खामगाव :2, नांदुरा :8, दे. राजा : 18, लोणार : 14, शेगाव : 3, बुलडाणा: अपंग विद्यालय 25, मलकापूर :6,
तसेच आजपर्यंत 35280 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7794 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7794 आहे.
आज रोजी 468 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 35280 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8185 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7794 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 278 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

बुलडाणा जिल्ह्यात ‘मीच माझा रक्षक’ ची पोलीस अधिक्षकांसह पोलिसांनी घेतली शपथ

nirbhid swarajya

‘श्रीं’ चा १४२ वा प्रकट दिन शेकडो दिंड्या विदर्भपंढरीत दाखल,भाविकांची गर्दी, संस्थानकडून जय्यत तयारी….

nirbhid swarajya

सिटी स्कॅनचे दर निश्चित; रुग्णांना दिलासा

nirbhid swarajya
error: Content is protected !!