January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आजप्राप्त 301 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

41 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 332 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 301 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 31 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 167 तर रॅपिड टेस्टमधील 134 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 301 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे: नांदुरा शहर :2, नांदुरा तालुका : नारखेड 1, बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 1, सातगाव म्हसला 1, सिंदखेड राजा शहर :1, मोताला तालुका : रोहिणखेड 1, चिखली तालुका : शिरपूर 1, जळगाव जामोद शहर : 3, लोणार तालुका : गुंधा 2, शेगाव शहर : 1, दे. राजा तालुका : सावखेड तेजन 1, दे. मही 1, मेहकर तालुका : सावत्रा 1, दे. माळी 2, मेहकर शहर : 2, खामगाव शहर : 4, खामगाव तालुका : शहापूर 1, मूळ पत्ता मसरुळ ता जाफराबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 31 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 4, मोताला :2, नांदुरा : 1, चिखली :15, लोणार:1, मलकापूर : 6, मेहकर : 2, जळगाव जामोद: 10.
तसेच आजपर्यंत 35087 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7635 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7635 आहे.
आज रोजी 313 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 35087 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8148 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7635 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 402 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 111 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी होणार

nirbhid swarajya

लग्नात पोलीस झाले वराती; वधू-वर पित्यांची उडाली धांदल..

nirbhid swarajya

चाकूचा धाक दाखवून पैसे लुटले;आरोपीला अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!