November 20, 2025
जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शेतकरी

विम्यापासून व कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनसाठी लढा उभारणाऱ्याची गरज- प्रशांत डिक्कर

जळगाव जामोद : सन 2019 -20 मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील जामोद मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा पिकाचा विमा काढलेला होता परंतु त्यांना या विम्याचा परतावा म्हणून विमा रक्कम मिळालेली नाही याउलट जळगाव जामोद तालुक्यात लगतच असलेल्या संग्रामपूर मध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 58 हजार रुपये विमा मिळालेला आहे, जामोद मंडळातील संत्रा उत्पादकांचे संत्रा पिकाची नुकसान झालेले असून सुद्धा त्यांना विमा कंपनीने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नव्हती ही बाब मंडळातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनीधी, तहसीलदार उपविभागीय अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे ही कैफियत शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्याकडे कथन केली. सुनगाव येथील बालाजी मंदिरात शेतकऱ्यांनी प्रशांत डिक्कर यांच्याशी संत्रा पिकविमा प्रश्नावर व कर्ज माफि पासुन वंचित असलेल्या प्रश्नावर चर्चा केली प्रशांत डिक्कर यांनी या वेळी शेतकऱ्यांच्या संत्रा पीक विम्याच्या अडचणीवर न्यायालयीन पर्याय शोधता येईल व कर्ज माफिसाठी लवकरच लढा उभा करुण शेतक-यांना न्याय मिळवुन देणार असे आश्वासन या वेळी दिले या कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री महादेवराव धुर्डे यांनी प्रशांत डिक्कर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, शेतक-यानसाठी लढाउ व्यक्तिमत्तव म्हणुन प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी शेतक-यांनी शेतकरी हिताच्या लढ्यसाठी उभे राहणे गरजेचे आहे. या बैठकित रामकृष्ण काळपांडे ,मंगेश धुर्डे, बळीराम धुळे, गजानन कपले, वसंत काळपांडे, सुरेश काळपांडे, वसंता वंडाळे ,सौ यशोदा काळपांडे ,तुळसाबाई धुर्डे, शांताबाई मिसाळ, विजय वंडाळे, आत्माराम अबडकार,गणेश वसूले, रमेश अबडकार ,पांडुरंग अबडकार ,निनाजी मिसाळ रमेश वंडाळे, श्रीराम राऊत ,वसंता धुळे वसंत ढगे, गजानन वंडाळे व इतर संत्रा उत्पादक शेतकरी हजर होते.

Related posts

मेहकर तालुक्यामधील जानेफळ मध्ये भीषण आग , आगीत पाच दुकाने भस्मसात, लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज , आग विझवण्यात यश , मात्र आगीचे अकारण अद्यापही अस्पष्ट .. 

admin

बैल धुण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त १२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!