January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

‘उमेद’ कायम ठेवण्यासाठी महिलांचा मूक मोर्चा

खामगांव : महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे, अशी राज्यातील महिलांची मागणी आहे. तसेच या अभियानात बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी 10 लाख महिलांनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एल्गार पुकारला आहे.राज्यात 2011 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ची (एमएसआरएलएम) अंमलबजावणी होत आहे. या अभियानात काम करण्यासाठी शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पण आता सरकार या उमेद संस्थेला बाह्य संस्थेच्या हाती देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात संस्थेतील विविध कंत्राटी महिलांनी मोर्चा काढला आहे.‘उमेद’ कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आतापर्यंत 4 लाख 79 हजार 174 समूह स्थापन करण्यात आले. यामध्ये 49 लाख 44 हजार 656 कुटुंब या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना जोडले. मात्र, कोणतेही पूर्व सूचना न देता, बबुलडाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा शासनाने अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या आहे. अभियानाशी जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला. तसेच शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला, त्यामुळे संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा ची परवानगी नाकारल्यामुळे ‘उमेद’च्या महिलांनी खामगांव येथील उपविभागिय अधिकारी यांच्या कार्यालयावर मुक मोर्चा काढून निषेध नोंदवला. उमेद अभियानाच्या खासगीकरणा विरोधात संपुर्ण जिल्ह्यात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या अभियानाचे खासगीकरण होत असल्याचा आरोप मोर्चातील महिलांनी केला आहे. मोर्चातील महिलांच्या विविध मागण्या आहेत. उमेद अभियानास मिळणारा निधी शासनाने पूर्वरत करावा. महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरूच राहावे. यामध्ये बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप होऊ नये.अशा विविध मागण्या यावेळी महिलांनी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे गावातील सर्व बचतगटाची कामे थांबली आहेत. कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी काल मोर्चा काढून खामगांव येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार जगताप मॅडम यांना निवेदन देण्यात आले. शासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या महिलांनी दिला आहे. यावेळी जयश्री देशमुख,जयश्री वांडे,सुजाता हिवराळे, आशा काकडे,मीरा वाघमारे, रत्ना डिक्कर, आम्रपाली गवई, शोभा बोंद्रे, जया सुरवाडे,कविता अरज, वैशाली साळवे,सविता बहुरूपी,रेखा गोल्लरआदी उपस्थित होते.

Related posts

ऑक्सिजन सेंटरसासाठी आमदार एकत्रितपणे पाठपुरावा करणार!

nirbhid swarajya

संतप्त महिलांनी नालीचे घाण पाणी आणून टाकले नगरपरिषद कार्यालयात

nirbhid swarajya

श्री.बालाजी मल्टपर्पझ फाऊंडेशनच्या वतीने वटपौर्णिमेला केली वृक्ष लागवड…

nirbhid swarajya
error: Content is protected !!