April 19, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 294 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

108 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 327 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 294 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 261 तर रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 294 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे – मलकापूर शहर : 3,मलकापूर तालुका : दुधलगांव 1, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : निंबा 1, माटरगांव 1, खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, घाटपुरी 2, मोताळा शहर : 1, लोणार तालुका : रायगांव 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 2, इस्लामपूर 1, बुलडाणा शहर : 8, मेहकर तालुका : दुधलगांव 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, पळसखेड चक्का 1, चिखली शहर: 1, चिखली तालुका : गुंजाळा 1, सवणा येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 108 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे – बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 7, अपंग विद्यालय 2, नांदुरा : 5, चिखली : 11, लोणार : 18, मेहकर : 9, सिं. राजा: 15, दे. राजा : 16, मोताळा : 8, शेगांव : 4, खामगांव : 9, मलकापूर : 4.
तसेच आजपर्यंत 34566 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7503 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7503 आहे.
आज रोजी 187 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 34566 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8092 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7503 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 483 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 106 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

Related posts

अतुल पाटोळे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानीत

nirbhid swarajya

वंचितच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

nirbhid swarajya

मराठा आरक्षणासाठी उद्या डफडे बजाओ आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!