November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 251 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 34 पॉझिटिव्ह

86 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 285 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 251 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 34 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 161 तर रॅपिड टेस्टमधील 90 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 251 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे – मोताळा तालुका: आडविहीर 1, अंत्री तेली 1, जळगाव जामोद तालुका: आसलगाव 1, वाडी खुर्द 1, जळगाव जामोद शहर: 4, बुलडाणा तालुका: चांडोळ 1, तांदुळवाडी 1, घाटनांद्रा 1, बुलडाणा शहर :1, दे राजा तालुका: डोलखेडा 1, दे. मही 1, सावंगी 3, सिंदखेड राजा शहर : 3, सिंदखेड राजा तालुका : दुसर बीड 1, चिखली शहर: 2, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 1, दिवठाणा 2, रान अंत्री 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : दे. माळी 3, गुंधा 1, , शेगाव शहर 1, येथील संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 34 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 86 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे – बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 15, चिखली: 16, नांदुरा: 4, दे. राजा : 14, मेहकर :17, मलकापूर: 8, जळगाव जामोद: 1, शेगाव: 8, खामगाव : 3,
तसेच आजपर्यंत 34272 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7395 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7395 आहे.
आज रोजी 297 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 34272 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8059 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7395 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 558 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 106 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

Related posts

जीवनावश्यक दुकानांची वेळेमधे बदल

nirbhid swarajya

महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दारू विक्रेत्यास रंगेहात पकडले

nirbhid swarajya

दारू विक्री व व्हिडियो वायरल प्रकरणी गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!