April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी

२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खामगांव : गोपाळ नगर भागातील भाटिया ले आउट येथील २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी उघड़किस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ नगर भागातील भाटिया ले आउट मधील कृष्णा पालीवाल २० असे मृतकाचे नाव असुन त्याने राहत्या घरातील वरच्या रूम मधे छताच्या हुकाला साडिच्या सहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल रात्री ८:३० वाजेपर्यंत कृष्णा खाली न आल्याने त्याची बहीण त्याला बोलावण्यास गेली असता सदर घटना उघड़किस आली.तात्काळ याबाबत ची माहिती पोलिसांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस स्टेशन ए पी आय राहुल जगदाळे व पो का एकनाथ खांदे हे घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसांनी तात्काळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आला. या प्रकरणी कृष्णा चे वडील भोजराज रमेशचंद्र पालीवाल ५५ यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधे दिलेल्या फिर्यादि वरुन कलम १७४ नुसार मर्ग दाखल करण्यात आला असुन पुढील पोहेका निलसिंग चव्हाण करीत आहे.

Related posts

पोलिसातील मस्तवाल मनोज अखेर खुंट्यावर!

nirbhid swarajya

पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी “समृद्धी महामार्गाचं लोकार्पण”, नागपूर ते शिर्डी आता फक्त ५ तासांत!…

nirbhid swarajya

गरिबांचा फ्रीज बाजारात विक्रीला, कुंभार व्यवसायाला परत कोरोनाचे ग्रहण

nirbhid swarajya
error: Content is protected !!