November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

स्विफ्ट कार ची दुचाकीला जोरदार धडक दुचाकीस्वार जागीच ठार

खामगांव : स्विफ्ट कारची दुचाकीला समोरून जोरदार धडक या धडकेट दुचाकीस्वार जागिच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास खामगांव चिखली मार्गावरील माथनी फाट्यावर घडला या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी कार चालका विरुद्ध गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. शहरातील टिचर कॉलनी येथील वसीम अहमद अब्दूल आहाद ३६ हे खामगांव चिखली मार्गारावरील माथनी फाट्यावर छोटा व्यवसाय करतात. ते आज दुपारी १:३० वाजताच्या सुमारास फाटयावरील चहाची हॉटल बंद करून दुचाकी क्र एम एच-२०-ए एच-८३३२ ही घेऊन जेवणासाठी घरी जात असतांना समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर क्र एमएच-३०ए टी-२४३४ चे चालकाने त्याचे ताब्यातील कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकी ला जोरदार धडक दिली या धड़केत टिचर कॉलनी येथील दुचाकीस्वार वसिम अहमद अब्दुल आहाद ३६ यांचा जागीच मृत्यु झाला.हा अपघात एवढा भयावह होता कि दुचाकी चा सुद्धाचेंदा झाला.तर या प्रकरणी मृतकाचा नातेवाईक याने ग्रामीण पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरुन उपरोक्त कार चालका विरुद्ध भादवी कलम २७९, ३०४,अ ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशन पोहेका शेक हमीद शेख करीम हे करीत आहे.

Related posts

बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १३ कोरोना पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

डोंगराजवळ आढळले इसमाचे प्रेत; घातपाताचा संशय

nirbhid swarajya

सिटी स्कॅनचे दर निश्चित; रुग्णांना दिलासा

nirbhid swarajya
error: Content is protected !!