November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

ऑक्सिजन सेंटरसासाठी आमदार एकत्रितपणे पाठपुरावा करणार!

खामगांव : शासकीय रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सेंटर उभं राहावं, याकरिता आज स्थानिक आमदार ऍड आकाशजी फुंडकर, माजी मंत्री व आमदार डॉ. संजयजी कुटे, आमदार श्वेताताई महाले आणि माजी आमदार विजयराजजी शिंदे, यांना पत्रकारांच्या वतीने शासकीय रुग्णालयाने जिल्हा नियोजन सामितीकडे जो प्रस्ताव दिलेला आहे, त्याची कॉपी देण्यात आली. या सर्व आमदार व नेत्यांना विनंती केली आपण जिल्ह्यात ऑक्सिजन सेंटरसाठी पाठपुरावा करावा. ऑक्सिजन कमतरते अभावी येणाऱ्या काळात कुणाचा जीव जायला नको. यावेळी भेट घेतलेल्या वरील सर्व सन्मानीय आमदारांनी आश्वासन दिलंय. याबाबत आम्ही एकत्रितपणे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करून, हा गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडवू. ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी 50 लाख खर्च येणार आहे. शासनाला हा प्रस्ताव मान्य करायला काय अडचणी आहेत, आणि का विलंब लागतोय, याचा आम्ही सुद्धा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. आज जर ऑक्सिजन सेंटर उभं राहिलं तर येणाऱ्या काळात कोविड रुग्णांना हा खूप मोठा दिलासा असणार आहे. उद्या जर कोविड रुग्ण वाढले तर ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्युदर सुद्धा वाढणार आहे. आजही गरीब रुग्णांना ऑक्सिजन बेड लवकरात लवकर कुठेही मिळत नाही. श्रीमंतांचे पण हेच हाल आहेत. पैसे देऊन सुद्धा खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑक्सिजन बेड शोधून सुध्दा सापडत नाही. त्यामुळे ही महत्वाची गरज ओळखून शासन व प्रशासन यांनी विलंब न लावता या कामाला प्राध्यान द्यावं. एक विचार जर केला तर गेल्या 6 महिन्यापासून फक्त कोविड बाबतचं विविध विकासकामं प्राधान्यक्रमाने करावी हेच एक मिशन सर्वांसमोर आहे. तरी अश्या कामांना आता तरी प्राधान्य देऊन ही कामे लवकरात लवकर केली जावी ही आमची अपेक्षा आहे. लवकरच याबाबत आम्ही पत्रकार व कोविड स्वयंसेवी नागरी मंचच्या माध्यमातून शासनस्तरावर सुद्धा भेटी घेऊन कामे झाली पाहिजे यांसाठी पाठपुरावा करत राहू.असे मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर यांनी सांगितले आहे

Related posts

अंबिकापूर येथील हाणामारी प्रकरणात खा. जाधव यांची भूमिका जातीय तेढ निर्माण करणारी; वंचित

nirbhid swarajya

वरवट बकाल येथील ज्वेलर्स ची 3 दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी..चोरट्यांचे तामगाव पोलीसांपूढे आव्हान !

nirbhid swarajya

“सपनोकी पठशाला”लघुचीत्रपट 29 मे रोजी झाला प्रदर्शित…

nirbhid swarajya
error: Content is protected !!