November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा

उद्यापासून सुरू होणाऱ्या हॉटेलची नियमावली जारी

खामगांव : उद्यापासून रेस्टॉरंट, बार सुरू होणार असल्याने सहा महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल उद्योगाला दिलासा मिळणार आहे.जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेने बार रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल चाचणी करण्यासह खान-पान शिवाय इतरवेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक असणार आहे. कोरोना रोखण्यासाठी बार व रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी या उद्योगावर अवलंबून असणारे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या मिशन बिगेन अंतर्गत खबरदारी घेऊन रेस्टॉरंट बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ग्राहकांनी सोशल डिस्टन्स पाळणे,टेबल मधे तीन फुटांचे अंतर ठेवणे, जागेचे निर्जंतुकीकरण करणे, स्क्रीनिंग करणे बंधनकारक राहणार आहे. नियम मोडल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येऊ शकते.
काय आहेत नियम व अटी : ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल चाचणी करावी, लक्षणें नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा, खानपान शिवाय इतरवेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक असणार आहे.हैंड सेनेटाइजर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. डिजिटल माध्यमाने चलन देण्यात प्रोत्साहन करावे.हात धुण्याच्या जागांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी लागणार आहे. काउंटरवर कॅशियर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सग्लास स्क्रीन असावी, शक्य असल्यास दारे व खिडक्या खुले ठेवाव्यात,क्यू आर कोड सारख्या माध्यमातून संपर्करहित मेनू कार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नैपकिन ऐवजी विघटनशील पेपर नॅपकिन वापरावे.टेबलमध्ये किमान १ मीटर अंतर ठेवावे. मेनूमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश करावा, कुठल्याही हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये बुफेला परवानगी नाही. सर्व भांडी गरम पाण्यात आणि मान्यताप्राप्त जंतुनाशक लिक्विडने धुवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे भांडे वापरावे, सर्व कर्मचारी N95 दर्जाचा मास्क वापरतील याची खबरदारी सुद्धा घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील शाळा-कॉलेज सिनेमागृह स्विमिंग पूल मात्र तूर्तास बंद राहणार आहे.

Related posts

भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खाजगी रेल्वे धावणार

nirbhid swarajya

30 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya

डॉ. आशिष अग्रवाल यांनी केली कंपाउंडर ला मारहाण; गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!