January 6, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शेतकरी

शेतकरी कायद्या विरोधात विधेयक जाळुन काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

खामगांव : महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात खामगाव मध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा तसेच ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसजनांच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढून निदर्शने करून शेतकरी व कामगार बचाव काळा दिवस पाळला जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या लोटपोटीचा निषेध देखील करण्यात आला. त्यामुळे ही घटना म्हणजे लोकशाही अशी गळचेपी असल्याचे आरोप देखील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी योगी सरकारवर केला आहे.तसेच याप्रसंगी शेतकरी व कामगार विरोधी कायदा रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ सुद्धा या वेळी करण्यात आला.

केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्याविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला असून ठिकठिकाणी अनेक पक्षांकडून तसेच आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू असून सरकारची शेतकऱ्यांची विरोधातील कायदा मागे घ्यावा शेतकऱ्यांची पिळवणूक न करता त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता सर्वत्र देशभर जोर धरत आहे.खामगावमधे सुद्धा काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकर्‍यांच्या वतीने “नरेंद्र मोदी किसान विरोधी” अशा घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले असून प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरदादा पाटील हे होते. यावेळी काँग्रेसचे डॉ. सदानंद धनोकार, पंजाबराव देशमुख ,विजय काटोले ,सुरेशसिंह तोमर ,किशोरआप्पा भोसले , स्वप्नील संजय ठाकरे, कृष्ण धोटे, गजानन वाकुडकर चैतन्य पाटील ,मनीष देशमुख ,संतोष चव्हाण, सचिन जयस्वाल ,आकाश जयस्वाल, तुषार चंदेल ,पुंडलिक डेंगे, फुलसिंग बोराडे, जितेंद्र देशमुख, गोविंद वाघ यांच्यासह असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

भाजपच्या वतीने भारतरत्न अटलजींना अभिवादन करून सुशासनदिन साजरा

nirbhid swarajya

लाखनवाडा येथे गणेश उत्सव निमित्त शांतात समितीची बैठक पार:-

nirbhid swarajya

सागवान परिसरात रंगली सापांची प्रणयक्रीडा

nirbhid swarajya
error: Content is protected !!