January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 361 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 103 पॉझिटिव्ह

76 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 464 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 361 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 103 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 88 व रॅपिड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 238 तर रॅपिड टेस्टमधील 123 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 361 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : कनका 8, नागझरी 4, डोणगांव 7, ब्रम्हपूरी 4, मेहकर शहर : 7, सि. राजा तालुका : साखरखेर्डा 3, राहेरी 2, पिंपळगांव ठोसर 2, दुसरबीड 1, लोणार तालुका : वडगांव तेजन 3, पळसखेड 1, खळेगांव 1,वढव 3, राजणी 4, लोणार शहर : 2, दे. राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दे. मही 3, पाडळी शिंदे 1, नारायणखेड 1, चिखली तालुका : अमडापूर 1, सातगांव भुसारी 1, धोत्रा भणगोजी 1, मोताळा तालुका : धा. बढे 2, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : नवी येरळी 1, येरळी 3, वडी 1, शेगांव शहर : 9, शेगांव तालुका : झाडेगांव 1, सांगवा 1, खामगांव शहर : 5, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, बुलडाणा शहर : 3 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 103 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.


तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मलकापूर : 14, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 3, खामगांव : 29, शेगांव : 14, नांदुरा : 13, चिखली : 3.
तसेच आजपर्यंत 30661 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6053 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6053 आहे.
आज रोजी 892 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 30661 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7288 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6053 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1140 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 95 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

बोरी अडगाव ग्राम सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनलचा विजय

nirbhid swarajya

शहरात स्वच्छतेचा उडाला बोजवारा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

nirbhid swarajya

भेंडवळची घटमांडणी जाहीर….

nirbhid swarajya
error: Content is protected !!