January 6, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर राजकीय विदर्भ

जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बुलडाणा : राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील 105 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने 30 सप्टेंबर रोजी काढले आहे. यामध्ये खामगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बदली झाली आहे तसेच बुलढाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांची नागपूर येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. मलकापूर मधील उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती प्रिया ढाकणे यांची सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. देऊळगावराजा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव नलावडे यांची नागपुर येथे साहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर नेमणुक करण्यात आली आहे.

तर सुनिल विष्णू पवार पोलिस उपाधीक्षक जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बुलढाणा यांची बदली सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर येथे करण्यात आली आहे. खामगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या जागेवर पांढरकवडा येथील अमोल विलास कोळी हे रुजू होणार आहेत.तसेच सुनील परसराम सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट हे देऊळगाव राजा येथे रुजू होणार आहेत. विठ्ठल यमावार उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथून मेहकर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.लवकरच हे सर्व अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजु होणार असल्याची माहिती आहे.

Related posts

बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

nirbhid swarajya

खामगांव सामान्य रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ५७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!