January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 398 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 167 पॉझिटिव्ह

41 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 565 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 398 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 167 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 155 व रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 270 तर रॅपिड टेस्टमधील 128 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 398 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर: 12, चिखली तालुका: धोत्रा भानगोजी 1, गोदरी 1, महिमळ 1, भरोसा 1, खंडाळा मकरध्वज 1, हरणी 2, येवता 2, मालगणी 1, सावरगाव बु 1, अमोना 1, मंगरूळ नवघरे 1, नांदुरा शहर : 18, नांदुरा तालुका : जवळा बाजार 1, निमगाव 1, मोताळा तालुका : इब्राहिमपूर 2, धा. बढे 1, शेलापुर 1, मोताळा शहर :2, मलकापूर शहर : 13, मलकापूर तालुका : दाताळा 2, वडजी 1, खामगाव शहर : 18, खामगाव तालुका : घाटपुरी 1, शिरला नेमाने 2, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 1, जळगाव जामोद शहर : 1, मेहकर तालुका : देऊळगाव सकर्षा 1, ब्रह्मपुरी 1, कनका 1, घाटबोरी 1, डोणगाव 2, गोहेगाव 1, मेहकर शहर : 4, दे. राजा तालुका : दे मही 2, दोड्रा 6, सुरा 6, पांगरी 2, धोत्रा 1, दे. राजा शहर : 11, सिंदखेड राजा तालुका : राहेरी बु 1, तढेगाव 2, सावरखेड नजिक 1, गुंज 1, साखरखेर्डा 4, लोणार तालुका : सुलतानपूर 1, सावरगाव मुंढे 2, बुलडाणा तालुका : देऊळघाट 2, चांडोळ 3, भादोला 1, दुधा 1, बुलडाणा शहर : 15 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 167 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत.


तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : चिखली :5, लोणार :2, दे. राजा : 14, खामगाव : 6, नांदुरा : 2, शेगाव : 1, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 11.
तसेच आजपर्यंत 29222 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5472 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5472 आहे.
आज रोजी 971 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 29222 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6770 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5472 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1214 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 84 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरु

nirbhid swarajya

बुलडाण्यात कोरोना पॉझेटीव्ह मृत रुग्णाच्या परिसरामध्ये शासनाचा रेड अलर्ट

nirbhid swarajya

शेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचाऱ्यांनी थांबवले कामकाज

nirbhid swarajya
error: Content is protected !!