January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

सिटी स्कॅनचे दर निश्चित; रुग्णांना दिलासा

मुंबई: राज्य सरकारने आता सिटीस्कॅनचे दर निश्‍चित केले आहे.त्यामुळे तपासणीसाठी ३ ते ४ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारता येणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.खाजगी रुग्णालयात किंवा तपासणी केंद्राकडून सिटीस्कॅनसाठी अवाजवी दर आकरण्याबाबत अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या.सरकारने याची दखल घेत सिटीस्कॅनच्या दरनिश्चितीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार समितीने सादर केलेला अहवाल सरकारने मान्य करत 16 स्लाईड पेक्षा कमी सिटीस्कॅन साठी अडीच हजार रुपये तर 64 पेक्षा जास्त असणारे सिटीस्कॅन यासाठी तीन हजार रुपये आकारता येतील. यापेक्षा जास्त किंमत आकारली तर कारवाईचा करण्याचा इशारा सुद्धा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. या सिटीस्कॅनमधे निर्जंतुकीकरण, पी पी ई किट, सिटी फिल्म, जीएसटीचा या दरामध्ये समावेश असणार आहे.तसेच आरोग्य विमा असणारे रुग्ण किंवा रुग्णालय, कॉर्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू होणार नाही अशी सुद्धा यावेळी सांगितले.

Related posts

डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश ; जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पासाठी निधी मंजुर

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये आंदोलन करणे भोवले; ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

लाखनवाडा पशु आरोग्य शिबीर आयोजित

nirbhid swarajya
error: Content is protected !!