April 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शेगांव

शेगाव चे कोविड रुग्णालय निव्वळ देखावा: शेगांव संघर्ष समितिचा आरोप

व्हेंटिलेटर बनले शोभेची वस्तू
शेगाव :- येथील सईबाई मोटे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शासनाने मोठा गाजावाजा करून ४ महिन्यापूर्वी कोविड १९ रुग्णांसाठी वेगळ्या कक्षाची उभारणी करून कोरोना ग्रस्त रुग्णाकरिता कोविड रुग्णालयाला सुरुवात करण्यात आली होती.तेच कोरोना रुग्णालय आज ४ महिन्यांनंतर ही सर्व सुविधा असतांनाही निव्वळ देखावा असल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आरोग्य राज्यमंत्री ही आहेत त्यांनी बंद चा पाठीमागे न लागता या मूलभूत गरजांवर लक्ष दिले तर निश्चित च रुग्णांची फरफट न होता त्याला खऱ्या अर्थाने उपचार मिळतील व रुग्ण संख्या ही कमी होणार असा आरोप शेगाव संघर्ष समितिने केला आहे.शेगाव शहरातील सईबाई मोटे रुग्णालय हे फार जुने रुग्णालय असून आधी ते स्त्री रुग्णालय म्हणून या पंचक्रोशीत नावाजलेले होते कारण त्या काळात स्त्री रुग्णालय हे फार कमी संख्येत होते कालांतराने ते जनरल रुग्णालय झाले नंतर काही वर्षाआधी या ठिकाणी शासनाकडून अत्याधुनिक इमारतीची उभारणी करण्यात येऊन या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला.मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागल्याने या रुग्णालयात शासनाने कोरोना ग्रस्त रुग्ण करिता ४० खाटांचे कोवीड रुग्णालयाची सर्व सुविधायुक्त उभारणी केली व रुग्णाला आवश्यक असणारे १९ व्हेंटिलेटर ही दिले. तसेच यामध्ये सेंट्रल ऑस्क्सिजन सिस्टीम ही लावण्यात आली. या रुग्णालयात आधीच सी टी स्कान मशीन,सोनोग्राफी मशीन,एक्सरे मशीन ह्या सर्व मशीन असल्याने कोरोना तपासणी करण्याकरिता रपिड किट,व्ही टी एम किट व औषध साठा पुरविण्यात आला होता. तरीही मागील काही दिवसांपासून शेगाव तालुक्यात व शहरात दररोज रुग्णाच्या संखेत झपट्याने वाढत असताना या रुग्णालयातून रेफर करण्याचे प्रमाण ही प्रचंड वाढले आहे. या रुग्णालयात उपचार मिळत नाही. सामान्य माणसाला त्रास होत असतांनाही तो आर्थिक स्थिती नसतांनाही या रुग्णालयात उपचारासाठी जात नव्हता. त्यामुळे त्याची अकोला व खामगाव शहरात कोरोना उपचाराचा नावाने लूट करण्यात येत आहे. त्याकरिता या अत्याधुनिक रुग्णालयाची सत्यता जाणून घेण्यासाठी शेगाव संघर्ष समिती ने शहरातील आरोग्य समिती सदस्य व गणमान्य नगरसेवक यांचेसोबत जाऊन पाहणी केली असता जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते. सईबाई मोटे रुग्णालय हे जरी शासकीय रेकॉर्डवर २०० खाटांचे असले तरी याठिकाणी उपजिल्हा दर्जा मिळाल्यापासून फक्त १०० खटा देण्यात आलेल्या आहेत.

त्यामधून ४० खाटा या कोविड कक्षा करिता दिल्याने आता रुग्णालयात इतर रुग्ण करिता ६० खाट उपलब्ध आहे. कोरोना कक्षाकरिता पुरवठा करण्यात आलेल्या १९ व्हेंटिलेटर आल्यापासून तसेश पेटी पॅक आहेत. त्याच्या जोडणी करिता लागणारे पार्ट यूपीएस,हेपि डीफायार, ऑक्सिजन कनेक्टर हे सोबत आलेले नाही.मागील ४ महिन्यात अनेकवेळा मागणी करूनही काहीच उपयोग नाही,त्यामुळे रुग्णाला जास्त त्रास झाल्यास व्हेंटिलेटर अभावी त्याला अकोला रेफर करण्यात येते.शिवाय सी टी स्कान मशीन आहे परंतु त्याला चालविणारा तंत्रज्ञ नसल्याने ती मशीन धूळखात आहे.आलेला रुग्ण हा कोरोना रुग्ण आहे काय हे तपासणी करिता रॅपिड किट , व्ही टी एम किट नसल्याने त्याची ओळख होत नाही , सेंट्रल आकसिजन सिस्टम बंद पडले आहे त्याशिवाय रुग्णालया ला ६० आक्सिज न सिलेंडर ची गरज असताना रुग्णालयात आजरो जी फक्त १७ छोटे व ४ मोठे जंबो सिलेंडर आहेत त्यामुळे कधी रुग्णांचा नातेवाईकांना च अकोला येथून सिलेंडर भरून आणावे लागते ही वस्तुस्थिती आहे म्हणून रुग्णाला जास्त त्रास झाल्यास आम्हाला पर्याय राहत नाही असे डॉ. प्रशांत चव्हाण यांनी सांगितले. वरील सर्व स्थिती पाहता जर पालकमंत्र्यांनी या मूलभूत सुविधा पुरविल्या तर निश्चित रुपात रुग्णांची आर्थिक लुबाडणूक ही नाही होणार व त्याला व नातेवाईकांना होणाऱ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही अन्यथा शेगाव संघर्ष समिती याचा पाठपुरावा करून रुग्णांना न्याय मिळून देणार आहे. या रुग्णालयात भेट देणाऱ्या समिति मध्ये शेगाव संघर्ष समिति चे शेखर नागपाल,विजय मिश्रा,आरोग्य समिति सदस्य प्रमोद काठोळे,नगरसेवक के टी चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते टी एस कलोरे,माजी नगरसेवक राजू भाऊ चुलेट हे होते.यावेळी रुग्णालयाचे डॉ.प्रवीण सांगळे,औषध प्रमुख मानकर आदी उपस्थित होते.

Related posts

खासदार राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन…

nirbhid swarajya

उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

nirbhid swarajya

प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार ॲड. आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!