January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 455 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

87 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 519 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 455 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 341 तर रॅपिड टेस्टमधील 114 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 455 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 10, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, बोरजवळा 1, गारडगांव 1, घाटपुरी 2, नांदुरा शहर : 9, नांदुरा तालुका :येरळी 2, खुमगांव 1, निमगांव 1, भुईशिंगा 1, माळेगांव गोंड 1, जळगांव जामोद शहर : 2, चिखली शहर: 2, चिखली तालुका : खंडाळा 1, मेरा खु 1, मेहकर शहर : 1, बुलडाणा शहर : 3, मलकापूर तालुका : दाताळा 1, भानगुरा 1, अनुराबाद 1, दे.राजा: 2, मलकापूर शहर : 9, शेगांव तालुका : आडसूळ 3, सवर्णा 1, शेगांव शहर : 6, संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 64 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 87 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : भुईशिंगा 1, दे. राजा शहर : 2, सिं. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : पिंपळगांव 1, दे. मही 4, गारगुंडी 5, बुलडाणा शहर : 15, बुलडाणा तालुका : कोलवड 1, साखळी 1, मेहकर तालुका : डोणगांव 1, पिंप्री माळी 1, शेलगांव दे. 1, उकळी 1, कल्याणा 1, मोताळा तालुका : धा. बढे 2, माळेगांव 1, मलकापूर शहर : 14, लोणार शहर : 1, लोणार तालुका : जांभूळ 1, शेगांव शहर : 15, शेगांव तालुका : जानोरी 1, जवळा बु 2, माटरगांव 2, चिखली तालुका : दुधलगांव 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 3, झाडेगांव 1, जामोद 1, जळगांव जामोद शहर : 2, मूळ पत्ता चावरा बाजार जि अकोला 1. तसेच आजपर्यंत 27500 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4987 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4987 आहे. आज रोजी 1169 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 27500 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6144 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4987 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1081 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 76 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

स्वतंत्र्य अमृत महोत्सव निमित्त जलंब येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न आयोजक अनंता नरवाडे

nirbhid swarajya

शेगांव तालुक्यात एकाचा बुडून मृत्यू; जिल्ह्यातील चौथी घटना

nirbhid swarajya

अवैधरित्या लाकडाने भरलेले वाहन पकडले

nirbhid swarajya
error: Content is protected !!