April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शिक्षण

मराठा समाजाचे आरक्षण संदर्भात डफड़े बजाव आंदोलन

खामगाव : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय कार्याल्यासमोर जय जिजाऊ जय शिवराय,एक मराठा लाख मराठा अश्या विविध घोषनासह दफड़े बजाव आंदोलन करुन लोकप्रतिनिधीना निवेदने देण्यात आली. येथील उपविभागीय कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डफडे वाजवून सरकारचे लक्ष् वेधले. मराठा आरक्षणाची मागणी शासन दरबारी लावून धरावी, यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. याप्रसंगी अॅड आ.आकाश फुंडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आ.दिलीप सानंदा यांना निवेदने देण्यात आली. तसेच याच मागणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे. खासदार प्रतापराव जाधव, यांनाही त्यांच्या प्रतिनिधीमार्फत निवेदने सादर करण्यात आली. शासनदरबारी मराठा आरक्षण जसे लागू आहे, तसेच कायम ठेवावे, मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश खारिज करावा व मराठा आरक्षण सरसकट लागू करावे, यासह विविध मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या असून यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, नेत्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शहरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related posts

बुलडाणा जिल्ह्यात शहरातून परतले ३८७७९ नागरिक

nirbhid swarajya

प्रेम प्रकरणातून युवकावर प्राणघातक हल्ला

nirbhid swarajya

जवाहर नवोदय विद्यालय शेगावचे 21 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हिमाचल प्रदेश मध्ये अडकले

nirbhid swarajya
error: Content is protected !!