November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

30 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

खामगांव : येथील पिंपळगाव राजा रोड वरील मुलींच्या वसतिगृहा मागे एका विहिरीत घाटपुरी येथील एका 30 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार घाटपुरी येथील प्रमोद चतारे वय 30 हा युवक पिंपळगाव राजा रोड वरील मुलींचे वसतिगृह मागे असलेल्या विहिरीमध्ये आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता विहिरित पोहत असताना तो खुप खाली गेला होता, त्याच्या मित्रांना वाटले की हा गंम्मत करत आहे. मात्र बराच वेळ झाला तरी प्रमोद हा वर नाही आला.त्याचा शोध घेतला मात्र तो दिसून आला नाही. आज दुपारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.विहिरी मधील कपारी मध्ये तो अडकला व त्याचा तेथेच श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रमोद चतारे यांचा मृतदेह बाहेर काढला.यावेळी घटनास्थळावर शिवाजी नगर पोलिस स्टेशन व तहसील कर्मचारी दाखल झाले होते.सदर मृतदेह आता पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनाचा पाठवले आहे.प्रमोद चतारे याच्या मृत्युमुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

Related posts

देशविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचून देशाला बळकट करा- सागर फुंडकर

nirbhid swarajya

ओबीसी विरोधी राज्य सरकार बरखास्त करा – सागर फुंडकर

nirbhid swarajya

नगरपालिकेच्या तक्रारी वरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!