November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शिक्षण शेतकरी

मराठा आरक्षणासाठी उद्या डफडे बजाओ आंदोलन

लोकप्रतिनिधींना देण्यात येणार निवेदन
खामगाव : मराठा आरक्षणासाठी उद्या 17 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने डफडे बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे लोकप्रतिनिधींना निवेदन देखील देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाने पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याच अंतर्गत आरक्षणासंदर्भात सर्व राजकीय पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा करावा याकरिता त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. स्थानिक टॅावर चौकात उद्या सकाळी 11 वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने डफडे बजाओ आंदोलन करून  सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिल्या जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार असून याची जबाबदारी  त्या- त्या पक्षातील मराठा पदाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे. तरी मराठा समाज बांधवांनी मास्क लावून, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग पाळत या डफडे बजाओ आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन सकल मराठा समाज खामगावच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

बस स्टॅन्ड वर छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल…

nirbhid swarajya

संविधानाने प्रत्येक नागरिकांना समान अधिकार दिला: अँड प्रशांत दाभाडे…

nirbhid swarajya

खामगाव पोळ्याला गालबोट,क्षुल्लक कारणावरून दोन गटात दगडफेक

nirbhid swarajya
error: Content is protected !!