खामगांव : अकोला-खामगांव महामार्गावरील कोलोरी फाट्याजवळ ट्रक व कार चा अमोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. अकोला राष्ट्रीय मार्गावरील कोलोरी फाट्याजवळ भरधाव ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन कार मधील चार जखमी झाले आहे.सदर अपघात काल 16 सेप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडला.अकोला येथून नाशिक कड़े फोर्ड इंडेव्हर क्र एम एच १५ जी यू ५००० जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्र एम पी ०९ जी एच 6068 ने भरधाव वेगाने समोरून धडक दिली. या धड़केत कार मधील चार जण जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघातात कुठलीही जीवितहानि झाली नाही. या प्रकरणी कार चालक आशीष सुरेश कुकरेजा वय ३३ यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरुन आरोपी ट्रक चालक जितेंन्द्र शंकर भोंडवे याच्या विरुद्ध भादवी कलम २७९,३३७,३३८,४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय शेख रब्बानी हे करीत आहे.
previous post