November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी चिखली बातम्या बुलडाणा

चांदमारी येथे जुगारावर अडड्यावर धाड; चोर सोडून सन्यासाला फाशी

खामगांव : येथील चांदमारी भागात शेलोडी रोड वरील एका घरात वरली सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून याठिकाणी जुगाराच्या चिठ्ठ्या व क्लब चालत असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांच्या खबर्‍याने दिलेल्या माहितीवर आज पोलिसांनी चांदमारी गजानन ठोंबरे यांच्या घरी सुरू असलेल्या रम्मी 27 पानपत्ते जुगारावर धाड टाकून 2405 रूपयाच्या मुद्देमालासह 2 आरोपींना अटक केली आहे.या घरामध्ये 10 ते 12 जुगारी बंद घरात जुगार खेळत होते, परंतु पोलीसांनी त्यांना सोडून तेथे कामगार म्हणून काम करणाऱ्यांना दोन जणांना पोलीस स्टेशनला आणून कार्यवाही सुरू आहे.पोलिसांच्या या भूमिकेमुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Related posts

शू्न्यातून विश्व निर्माण करणारे सतिषअप्पा दुडे

nirbhid swarajya

Global Funds Expanding Into Massive Chinese Investment Market

admin

धरणात बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

nirbhid swarajya
error: Content is protected !!