April 19, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

ज्‍येष्ठ गाैरींच्‍या देखाव्‍यातून डॉक्‍टरांबद्दल व्‍यक्‍त केली कृतज्ञता

खामगांव येथील ठाकरे कुटूंबियांचा स्‍तुत्‍य उपक्रम

खामगाव : गणेशोत्‍सव व गौरी पुजनानिमित्‍त घराघरात सध्या भक्‍तीमय वातावरण दिसत आहे. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्‍या कारणाने माेठ्या धामधुमीत साजरे होणारे गौरी पुजनाचे कार्यक्रम यावर्षी साध्या पध्दतीने साजरे होतांना दिसत आहेत. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदा गणेशोत्‍सव व गौरी पुजनातून सामाजिक संदेश देणारे देखावे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत. कोणी निसर्गाबद्दल आपले सामाजिक विचार मांडत आहेत, तर कोणी कोरोनापासून आपला बचाव कसा करावा व त्‍यासाठी कोणती दक्षता घ्यावी यासाठी सामाजिक संदेश देत आहेत. असाच सामाजिक संदेश येथील अनिकट रोड भागातील रहिवासी प्रवीण रमेश ठाकरे यांच्‍या कुटूंबियांनी दिला आहे.कोरोना काळात आपल्‍या जीवाची पर्वा न करता जनतेच्‍या रक्षणासाठी डॉक्‍टर, पोलीस, सफाई कर्मचारी, परिचारीका यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्‍यांच्‍या कार्याप्रति कृतज्ञता व्‍यक्‍त करीत ठाकरे कुटूंबियांनी त्‍यांच्‍या घरी विराजमान केलेल्‍या ज्‍येष्ठ गौरींना डॉक्‍टरांचा वेश परिधान केला असून कोरोना काळात त्‍यांनी रात्रंदिवस घेतलेल्‍या मेहनतीचे मोल इतरांनाही कळावे या हेतूने हा देखावा साकारला आहे. सोबतच मखरामध्ये कोरोनापासून बजावासाठी शासनाने जे नियम आखून दिले आहेत. यांचा देखील संदेश दिला आहे. त्‍यामुळे परिसरात सर्वत्र ठाकरे कुटूंबियांनी साकारलेल्‍या या देखाव्‍याचे व कृतज्ञता व्‍यक्‍त करण्याच्‍या कल्‍पनेचे कौतुक होत आहे.

असे होत आहे भाविकांचे आदरातिथ्थ
यातील विशेष बाब म्‍हणजे येथे येणाऱ्या भाविकांना घरात प्रवेश घेण्यासाठी सॅनिटायझर ने स्‍वच्‍छ हाथ धुवून घरात प्रवेश दिला जात असून प्रत्‍येकाला मास्‍कचे वाटप करण्यात येत चाहे विशेष म्‍हणजे डॉक्‍टर, पोलीस इतरही क्षेत्रात कार्यरत असलेले व कोरोना लढाईत महत्‍वाची भुमिका बजावत असलेल्‍या शहरातील कोरोना योध्यांचा ठाकरे कुटूंबियांच्‍या वतीने सन्‍मान देखील करण्यात येणार आहे.

आमच्‍या दरवर्षी ज्‍येष्ठ गौरींचे पुजन होत आहे. परंतु यावर्षीची परिस्‍थिती वेगळी आहे त्‍यामुळे कोरोनाच्‍या या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत आपणही काही वेगळे करुन कोरोना महामारीबद्दल जनजागृतीपर संदेश द्यावा ही संकल्‍पना डोक्‍यात आली व शेवटी कुटूंबियांशी चर्चा करुन आम्‍ही सर्वांना ज्‍या डॉक्‍टरांनी आपल्‍या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतली. त्‍या डॉक्‍टरांबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍ती करण्याकरीता हा देखावा साकारला आहे असे प्रविण ठाकरे यांनी सांगितले आहे.

Related posts

सुटाळा खु.ग्रामपंचायत सदस्या सौ.शितल ठाकरे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी

nirbhid swarajya

दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!

nirbhid swarajya

जिल्ह्यातील 15 मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द

nirbhid swarajya
error: Content is protected !!