January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

खामगांव मधे मानाच्या लाकडी गणपतीची साध्या पद्धतीत स्थापना

खामगांव : राज्यातील एकमेव लाकडी गणपती खामगावात १५० वर्षांपूर्वी मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा नवसाला पावणारा मानाचा गणपती नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचे महाराष्ट्रभर नावलौकिक आहे.या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे १५० वर्षांपूर्वी झाली. दर गणेश चतूर्थीपासून अनंत चर्तुदशी पर्यंत या मंदिरात दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणूकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची १५० वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मधील १५० वर्ष आधीची ही आहे. लाकड़ी गणपती मूर्ति खामगाव शहरामधून वाहनाऱ्या बोर्डि नदी मध्ये ही मूर्ति संपूर्ण लाकडाची असल्याने सुमारे १५० वर्ष पूर्वी वाहत आली होती त्यावेळी नागरिकांनी ती पकडून मूर्तिचि स्थापना केली. आज रोजी या मूर्तिला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. गणेशोत्सवात या मूर्तिचि स्थापना झाल्या नंतरच इतर इतर मुर्त्यांची स्थापना केली जाते.विसर्जन करतांना सर्वात पुढे मानाचा गणपती असतो.दहा दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. दहाव्या दिवशी मिरावणुकी नंतर या मुर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते, ही मूर्ति विसर्जित केली जात नाही हे विशेष…या नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगांवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व छत्तीसगडवरून मोठया प्रमाणावर भाविक भक्त येतात. शिव व पेशवेकाळात सुमारे १५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव व रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सहा फूट उंचीची ही मुर्ती अतिशय आकर्षक लोभस व देखणी आहे. संपूर्ण लाकडी शिल्पातून ही मूर्ती साकार झाली आहे. काष्ठशिल्पाचा तो पुरातन वैभवशाली तसेच प्रेरणादायी ठेवा आहे. यामूर्तीची प्रतिष्ठापना आचारी अय्या लोकांनी केली आहे. सन १९५० नंतर खामगांवचे अडते मेसर्स जयनारायण नंदलाल व इतर धान्य व कापूस खरेदीदारांनी नोंदणी केली. लाकडी गणपती श्रीगणेश मंदिराचे त्यावेळी विश्वस्त म्हणून माताशरण दुबे, लक्ष्मण हिवरकर, त्र्यंबकलाल पुरवार, दत्तात्रय वरणगांवकर, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी व गंगाधर पिवळटकर यांनी काम पाहिले. यानंतर सन १९९५ साली धर्मदाय आयुक्तांनी आर. बी.अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात हे मंदिर दिले. त्यानंतर सन १९९६-९७ मध्ये मिंदराचा जिर्णोध्दार करून नवीन वास्तू बांधण्यात आली. मंदिराची वास्तू आधूनिक मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. खामगांवात विसर्जन मिरवणूकीत लाकडी गणपतीला प्रथम मानाचे स्थान आहे. जोपर्यंत लाकडी गणपतीची मिरवणूक फरशीवर येत नाही तोपर्यंत इतर मंडळाच्या मिरवणूकीस सुरूवात होत नाही. ही परंपरा खामगांवात तंतोतंत पाळली जाते. लाकडी गणपतीची मिरवणूक न निघाल्यास इतरही मिरवणूका निघत नाहीत. अलिकडे मंदिर विश्वस्तांनी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यात रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम आदिंचा समावेश आहे. खामगांवचा लाकडी गणपती महाराष्ट्रातील एकमेव असल्याने व त्याला दीड शतकाची परंपरा असल्याने भाविकांची या गणपतीवर प्रचंड श्रध्दा आहे.

Related posts

गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटांची व्यवस्था

nirbhid swarajya

कोरोना योध्दांसाठी दानदात्यांकडून मदतीचा ओघ सुरूच , नाव न सांगता दिली मोठी मदत

nirbhid swarajya

खामगांव मतदार संघातील सरपंच पदाच्या निवडणूकीत १६ जागांवर काॅंग्रेसचा विजय तर वंचित आघाडी दुसऱ्या क्रमांकावर

nirbhid swarajya
error: Content is protected !!