November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

स्व. भाऊसाहेब फुंडकर जयंती निमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम

न.प.तर्फे स्वच्छता व वृक्षारोपण पंधरवडा
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे होणार वाटप

खामगाव : दिवंगत कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी नगर पालिका व भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस येथील शक्ती स्थळावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पूजन करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता नगरपालिकेतर्फे आयोजित स्वच्छता व वृक्षारोपण पंधरवाड्याचे उद्घाटन करण्यात येईल. या पंधरवाड्यांतर्गत 21 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान शहरातील 1 ते 16 या प्रत्येक प्रभागात साफ सफाई अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता स्थानिक सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात येईल तर दुपारी 12 वाजता न.प.तर्फे स्व.भाऊसाहेब फुंडकर शिष्यवृत्ती योजनंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क लावून सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष शेखर पुरोहित,भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष पवन गरड तसेच न.प.च्या वतीने करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोंबर पर्यत कर भरणा-यांना मिळणार ट्री गार्डची भेट नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना कर भरण्यास व वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिनव योजना आखण्यात आली आहे. यानुसार 31ऑक्टोबर 2020 पर्यंत 5 हजार रुपयांपर्यंत कराचा भरणा करणार-या करदात्यांना प्रत्येकी 1 ट्री गार्ड तर 5 हजारापेक्षा जास्त कर भरणा-या करदात्याला प्रत्येकी 2 ट्री गार्ड भेट स्वरुप देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर भाऊसाहेबांच्या जयंती दिनी 10 ट्री गार्डचे वाटप आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तरी नागरिकांनी कराचा भरणा करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related posts

रागाच्या भरात मनोरुग्न मुलाकडून वडिलांचा खून

nirbhid swarajya

उद्योगमंत्री उदय सामंतांच्या आदेशाची अंमलबजावणी केंव्हा ?

nirbhid swarajya

मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर लांजुडकर यांची निवड…

nirbhid swarajya
error: Content is protected !!