January 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

खामगांव मधे बैलपोळा साध्या पद्धतीने झाला साजरा

खामगाव : खामगाव शहरात दरवर्षी पोळा निमित्त बैलांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत असते. हा पोळा पाहण्यासाठी शहरवासीयांची मोठी गर्दी असते परंतु यावर्षी कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने पोळा भरलाच नाही.
दरवर्षीप्रमाणे आज 18 ऑगस्ट रोजी पोळा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटामुळे यावर्षी शहरातील फरशी भागात सामुहिकरित्या पोळा भरला नाही. पोळ्याला 500 वर्षपूर्वीची जूनी परंपरा आहे. ही परंपरा खंडित न होऊ देता आज देवेंद्र देशमुख यांच्या वाड्यावर गुढीची पुजा करून गुढीसह मानाची बैलजोडी ही सर्व प्रथम मानाच्या वनारे व क्षीरसागर यांच्या घरी नेऊन तेथील गुडी घेऊन आई तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी नेण्यात आली व तेथे मानाची आरती करण्यात आली. तद्नंतर शीतला माता मंदीरात मानाची गुडी व बैलजोडी यांची पुजा करुन आंब्या तोरण बांधुन व नारळ फोडण्यात आले आणि साध्य पद्धतीत बैलपोळा फोडण्यात आला.या दरम्यान सोशल डिस्टंसींगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुद्धा करण्यात आले.

Related posts

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

nirbhid swarajya

चितोडा अंबिकापुर येथे आमदार राजेश एकडे यांची भेट

nirbhid swarajya

जिल्हा परिषद अध्यक्षा यांची आरोग्य केंद्रांना भेट

nirbhid swarajya
error: Content is protected !!