April 18, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 155 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 104 पॉझिटिव्ह

50 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 259 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 155 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 104 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 92 व रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 99 तर रॅपिड टेस्टमधील 56 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 155 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले कोविड केअर सेंटरनिहाय अहवाल पुढीलप्रमाणे : कोविड केअर सेंटर बुलडाणा : महिला 13, पुरूष 27, एकूण 40. कोविड केअर सेंटर आयुर्वेद महाविद्यालय बुलडाणा : पुरूष 6, महिला 3, एकूण 9. कोविड केअर सेंटर मेहकर : महिला 4, पुरूष 7, एकुण 11. कोविड केअर सेंटर नांदुरा : पुरूष 7, एकूण 7. कोविड केअर सेंटर मलकापूर : महिला 2, पुरूष 3, एकूण 5. शासकीय सामान्य रूग्णालय खामगांव : महिला 10, पुरूष 15, एकूण 25. कोविड केअर सेंटर सिंदखेड राजा : महिला 2, पुरूष 1, एकूण 3. कोविड केअर सेंटर शेगांव : महिला 2. कोविड केअर सेंटर देऊळगांव राजा : महिला 1 व पुरूष 1, एकूण 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 104 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 50 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर निहाय सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोविड केअर सेंटर बुलडाणा : महिला 10, पुरूष 6, एकूण 16. कोविड केअर सेंटर देऊळगांव राजा : महिला 4. कोविड केअर सेंटर जळगांव जामोद : महिला 1, पुरूष 2, एकूण 3 . कोविड केअर सेंटर खामगांव : पुरूष 5, महिला 4, एकूण 9. कोविड केअर सेंटर लोणार : पुरूष 5, महिला 1, एकूण 6. कोविड केअर सेंटर मेहकर : महिला 1. कोविड केअर सेंटर नांदुरा : महिला 1. कोविड केअर सेंटर शेगांव : महिला 4, पुरूष 2, एकूण 6. शासकीय सामान्य रूग्णालय खामगांव : पुरूष 2, महिला 1, एकूण 3 . महिला रूग्णालय बुलडाणा : पुरूष 1.
तसेच आजपर्यंत 14371 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1449 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1449 आहे.
आज रोजी 123 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14371 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2356 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1449 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 867 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 40 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

युथ पॅंथरच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

nirbhid swarajya

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे ३ जण ताब्यात

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 32 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!