खामगाव : राज्यातील सर्व न.प. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी येथील न.प. कर्मचारी संघटनेकडून एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. शासनाकडून राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, रोजंदारी व संवर्ग कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत अनेकवेळा निवेदन देण्यात आले. तसेच संघटनेकडून निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त तथा संचालक यांच्याशी प्रत्यक्ष बैठका घेवून मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केल्या आहेत. तरीही शासनाकडून अद्यापपर्यंत मागण्या पुर्ण करण्यात आलेल्या नाही.त्यामुळे आज येथील न.प कर्मचारी संघटनेकडून न.प. समोर एक दिवसीय आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास येत्या ५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात राज्य कार्यकारीणी सदस्य मोहन अहिर,जिल्हाध्यक्ष अनंत निळे, दुर्गासिंह ठाकुर, सुभाष शेळके, सुनिल सोनोने, मंगेश पंचभुते, कमलाकर चिकणे, सुरेशसिंह भादोरिया, राजेश मुळीक, एन.डी. जोशी, सतिष पुदाके, उमेश अग्निहोत्री, महेंद्र वानखेडे, डी.टी. थोरवे, सचिन पल्हाडे, के.जी.शर्मा, केवल हट्टेल, जयवंत देशमुख, एल.जी. राठोड यांचेसह कर्मचाऱ्याचा सहभाग होता.