November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

बालिकेवर अत्‍याचार प्रकरणात आरोपीस जन्‍मठेप

अनुसुचित जाती, जमाती कायद्यान्‍वये जन्‍मठेपेची जिल्‍ह्यातील पहिली शिक्षा

खामगाव : दहा वर्षीय बालिकेवर अत्‍याचार प्रकरणात येथील जिन्‍ल्‍हा विशेष न्‍यायालयाने येथील एका आरोपीस जन्‍मेठेपेसह विविध गुन्‍ह्याखाली शिक्षा ठोठावली. विशेष म्‍हणजे अनुसुचित जाती जमाती कायद्यान्‍वये बालिकेवर अत्‍याचार कायद्यान्‍वये बालिकेवर अत्‍याचार प्रकरणात जन्‍मठेपेची शिक्षा झालेला जिल्‍ह्यातील हा पहिला निकाल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्‍यातील सुटाळा बु. येथील 10 वर्षीय बालिका आईचे निधन झाल्‍याने व वडील सोडून गेल्‍याने भावंडांसोबत राहत होती. दरम्‍यान २२ डिसेंबर २०१६ रोजी इंदिरा नगर भागातील रामा विठ्ठल नंदनवार राजपूत याने तिला दहा रुपये देतो बोरं आणायला जावू असे आमिष दाखवून गावाजवळील शेतात नेले व तिच्‍यावर पाशवी अत्‍याचार केला. कोणला सांगितल्‍यास जिवे मारण्याची धमकी देवून आरोपीने पाेबारा केला. घरी परतल्‍यावर भेदारलेल्‍या पिडीतेने कुणालाही याबाबत सांगितले नाही. भावाने विचारले असता पोटात दुखते असे सांगुन ती झोपुन राहिली. दुसऱ्या दिवशी शेजारी महिलेस तिने आपबिती सांगितली. त्‍यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. तत्‍कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी या प्रकरणाचा तपास करुन प्रकरण न्‍यायप्रविष्ठ केले. न्‍यायालयाने या प्रकरणात अकरा साक्षीदार तपासले. दोष सिध्द झाल्‍याने जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाचे विशेष न्‍यायाधिश आर. डी.देशपांडे यांनी आरोपीस विविध कलमान्‍वये शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्‍त शासकीय अभियोक्‍ता रजनी बावस्‍कर भालेराव यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्‍हणून पोहेकाँ राजेंद्र ठाकुर यांनी सहकार्य केले. पिडीतेस शासनाकडून पुर्नविस्थापनासाठी योग्य ती मदत मिळावी याकरीता जिल्हा विधी समितीकडे न्यायालयाने शिफारस केली आहे.

Related posts

जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

nirbhid swarajya

कोविड रूग्णालयाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

nirbhid swarajya

अवैध पने सालई गोंधने भरलेल्या चारचाकी वाहन पकडले अकोट वन्यजीव विभागाची कार्यवाही…

nirbhid swarajya
error: Content is protected !!