खामगाव : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवार म्हणजेच आज 17 ऑगस्ट रोजी शहरातून कावड यात्रा निघत असते. मात्र यावर्षी कावडयात्रा उत्सवाला कोरोना संसर्गाचे ग्रहण लागले आहे. श्रावण महिना हिंदु संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाव्दारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तिर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदीरात जलाभिषेक करीत असतात. उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप येत असते. प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील विविध मंडळांचे शेकडो कावडधारी तीर्थस्थळांवरून खांद्यावर कावड घेवून जल आणत असतात. आज श्रावणातील शेवटचा सोमवार असून कावडधारींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून श्रावण महिन्यात विविध नदी पात्राचे जल आणून महादेवाच्या पिंडिवर वाहन्याची परंपरा आहे. येथील जय संतोषी माँ मंडळाच्या वतीने सहा वर्षापासून कावड यात्रा काढण्यात येते.यावर्षी कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याच्या बाहेर न जाता जिल्ह्यातील पूर्णा नदिच्या पात्रतुन जल घेऊन 70 किमी चा प्रवास करत दाखल झाले, व आगळा वेगळा संदेश देत सोशल डिस्टनसिंग ठेवत मास्क लाउन व कोरोना फाइटर्स चा सन्मान करा, गर्दी टाळा कोरोनाला पळवा, कोरोनाला हरवुया देशाला जिंकवुया अश्या विविध सूचना फलक घेऊन आगळी वेगळी कावड़ यात्रा काढण्यात आली.दरवर्षी वाजत-गाजत कावडधारींची शहरातून भव्य मिरवणूक काढत असतात मात्र या वर्षी कोरोना मुळे कोणत्याही मंडळाने DJ किंवा बॅण्ड पथक आणले नसून अत्यंत साध्या पद्धतीने कावड़ यात्रा काढली आहे.यामध्ये खामगांव मधील अनेक मंडळ कावड घेऊन आले होते. मात्र यावर्षी यामध्ये शिवभक्त थोड्याफार संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.