January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

कोरोनाशी लढत जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न -पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन थाटात साजरा

बुलडाणा : राज्य आपल्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या अभूतपुर्व संकटातून जात आहोत. कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे. शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे. कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करीत अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाशी लढत जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतीपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत असलेला प्रत्येक निर्णय, दिलेली प्रत्येक सूचना याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अगदी मनापासून काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री महणाले, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, महसूल, पोलीस तसेच अन्य सर्व प्रशासनाचे विभाग, आमचे सफाई कर्मचारी कोरोनाच्या या लढाईत सर्वात पुढे आहेत. आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील बाराशे पेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. नुकतेच जिल्हा मुख्यालयी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अद्ययावत 100 बेडचे कोविड समर्पित रूग्णालय रूग्णांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे. तसेच देऊळगांव राजा येथे 20 बेडचे रूग्णालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. कोरोना विषाणू निदान करण्यासाठी बुलडाणा येथे RTPCR प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोना चाचणींची संख्या वाढून कोरोना निदान लवकर करणे शक्य होणार आहे.

Related posts

ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…

nirbhid swarajya

महाजन कुटुंबातील आठ सदस्य कोरोनाच्या लढाईत

nirbhid swarajya

महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दारू विक्रेत्यास रंगेहात पकडले

nirbhid swarajya
error: Content is protected !!