January 4, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

महिलेला मोबाइलवर ट्रिपल तलाक दिल्या प्रकरणी औरंगाबादचे 4 जणांवर गुन्हा दाखल

बुलडाणा : येथून जवळ असलेल्या देऊळघाट येथील एका विवाहीतेला पतीने मोबाईलवर धमकी देवून गैर कायदेशीर 3 वेळा तलाक दिला असून पती सह 4 लोकां विरोधात बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसाने दिलेली माहिती अशी की देऊळघाट येथील एका 22 वर्षाय महिलेचा औरंगाबाद येथील सै.साबीर सै. बशीर यांच्या सोबत 5 मार्च 2017 रोजी मुस्लीम धर्मानुसार औरंगाबाद येथे इस्तेमामध्ये विवाह झाला होता. त्यांना 2 वर्षाचा एक मुलगा आहे.परंतू लग्न झाल्यापासून पिडीत विवाहीतेला सासरची मंडळी त्रास देत होते, त्यामूळे 8 महीन्यापूर्वी पीडित माहेरी देऊळघाट राहायला आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या काळात पती किंवा सासरचे कुणी त्याला घ्यायला आले नाहीत. दरम्यान पतीने मोबाईलवर धमक्या देवून 3 वेळी तलाक दिलय,असेही तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीवरुन 8 ऑगस्ट रोजी आरोपी पती सै. साबीर सै. बशीर, सह सुल्ताना बी सै. बशीर,सै. बशीर सै. हीराजी व आयशा बी सै. बशीर सर्व रा.संजय नगर, बायजी पूरा,औरंगाबाद यांच्या विरुद्ध मुस्लिम महिला (विवाह हककांचे संरक्षण) वटहुकुम 2018 ची कलम 4 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार सुभाष चोपडे करीत आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 83 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 08 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

क्षुल्लक कारणावरून ट्रक चालकास लाथा बुक्यांनी मारहाण

nirbhid swarajya

बाजार समिती मधील २ व्यापारी नॉट रिचेबल

nirbhid swarajya
error: Content is protected !!