November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

शाळेच्या आवारात दारुच्या पार्ट्या

जलंब : कोरोनामुळे संपुर्ण राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. सर्व बार बंद असल्याने मद्यपीना दारू पिण्यासाठी जागा मिळत नसल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोरील मैदानात व ओटया वर रात्रीच्या वेळी दारुच्या जंगी पार्ट्या होत असल्याचे समोर आले आहे. पार्ट्या झाल्यानंतर मद्यपी दारुच्या बाटल्या जागेवरच सोडून निघून जात असल्याने मैदानात व ओटया वर बाटल्यांचा खच पडलेला आढळून येतो. शाळेत कोणी रखवालदार नसल्यानेच राजरोसपणे दारुच्या पार्ट्या होताना दिसत आहेत.
दारु पिण्यास निवांत जागा मिळत नसल्याने स्थानिक मद्यपींकडून शाळेच्या मैदानाचा वापर सुरू झाला आहे. अंधार होताच मद्यपी शाळेच्या आवारात शिरून समोरील ओटयावर बसून दारू आणि दारुच्या बाटल्या फोडून जंगी पार्ट्या करीत आहेत. मैदानातील जागेवर अंधाराचा फायदा घेऊन दररोज पार्ट्यांचा बेत आखला जात आहे.दारुच्या पार्ट्या झाल्यानंतर मद्यपीं बियरच्या बाटल्या जागेवर सोडून घरी निघून जातात.तसेच शाळेपासुन काही अंतरावर एक शिक्षिका राहते तर हाकेच्या अंतरावरच पोलिस स्टेशन असतानाही हे, तळीराम त्यांच्या नाकावर टिच्चून संध्याकाळ होताच शाळेच्या आवारात दारूच्या पार्ट्या रंगत असतानाही यावर पोलिस प्रशासनाची वचक राहीली नाही हेच सिद्ध होते.
संध्याकाळ होताच शहरातील काही उन्नाड टोळके हे शाळेच्या आवारातच बसून दारूच्या पार्ट्या रंगवत असल्यामुळे शाळेला एखाद्या दारू अड्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. अशा तळीरामावर शिक्षण विभागाकडून व पोलिस प्रशासनाकडून दारूड्यांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related posts

अग्रसेन चौकात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्‍ह्यात आजपासून संचारबंदी लागू

nirbhid swarajya

आत्मक्लेश जागर आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनो सहभागी व्हाव्हे- श्याम अवथळे

nirbhid swarajya
error: Content is protected !!