November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी

क्षुल्लक कारणावरून ट्रक चालकास लाथा बुक्यांनी मारहाण

खामगाव : धनज येथे गॅस सिलेंडर खाली करून मुंबईला परत जात असताना ट्रक चालक अर्जुन किसन चव्हाण हे पारखेड फाट्याजवळील बाबा रामदेव ढाब्यावर काल ७ ऑगस्ट रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी थांबले होते. जेवण आटोपून ट्रक क्र.एमएच०४-जेयु-२७३९ कडे जात असताना सागर भागवत देलोकार रा.पारखेड व अजय मोहन तायडे रा जयुपर लांडे या दोघांनी दारुच्या नशेत ट्रक च्या कॅबिन मद्धे जाऊन काचा लाथा बुक्यानी फोड़ल्या व ट्रक् चालक अर्जुन चव्हाण याला अश्लील शिविगाळ केली व लॉकडाऊन असताना तू ट्रक कसा काय घेऊन चालला असे म्हणून खाली उतरवून बाजूला पडलेली काठी अजय तायड़े याने हातात घेऊन अर्जुन चव्हाण याच्या डोक्यावर हातावर मारली व सागर बेलोकार याने लाथा बुक्यानी पाठीवर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच ट्रक्ट चे 15 हजाराचे नुकसान केले. या प्रकरणी ट्रक्ट चालक अर्जुन चव्हाण यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन दिलेल्या फिर्यादि वरुन उपरोक्त दोघांविरुद्ध कलम २९४,३२४,४२७,५०४,३४ भादवी कलम ६५ ई मदाका नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोहेका मनोहर कोल्हे करीत आहे

Related posts

संदीप श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी घेतला सूर्यग्रहणाचा प्रत्यय

nirbhid swarajya

मरणा नंतर देहदान करून मोहनराव झाले अजरामर

nirbhid swarajya

बहिणीच्या घरातील साहित्याला भावाने लावली आग

nirbhid swarajya
error: Content is protected !!