January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी

फेक कॉल द्वारे संपर्क साधुन ७० हजाराने फसवणूक

खामगांव : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंत्याच्या बँक खात्यातून चक्क ११ लाख रूपये ऑनलाईन पध्दतीने लंपास केल्याची घटना ताजी असताना एका अनोळखी महिलेने फेक कॉल वर संपर्क साधुन ७० हजाराने फसवणूक झाल्याची घटना घडली असून आरोपी विरुद्ध फसवणूकिचा गुन्हा दाखल केला केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील वामन नगर भागातील रहिवासी प्रदीप वसंतराव माहुरकर यांच्या भ्रमणध्वनीवर ६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता अनोळखी मोबाईल क्रमांक 8009182347 या वरुन पल्लवी मल्होत्रा नावाने कॉल करून माहुरकर यांच्या क्रेडिट कार्ड व बैंक खाते संबंधी माहिती विचारली व क्रेडिट कार्ड व खाते क्लोन करून खात्यातील ६९ हजार ८२६ रूपये काढून फसवणूक केली.पैसे काढल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइल वर आल्या नंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन मधे जाऊन आपली तक्रार नोंदवली. याप्रकरणी प्रदीप माहुरकर यांनी शहर पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ४१५, ४२० सह कलम ६६ (क) (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.ऑनलाइन फ्रॉड चे प्रमाण कमी करण्यासाठी कुठल्याही आमिषाला किंवा बँकेकडून माहिती विचार न करता फोन आला असल्यास त्यांना बळी न पळता त्यांनी माहिती देऊ नये असा कॉल आल्यास त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये माहिती कळवावी असे आवाहन सुद्धा शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे.पुढील तपास पो हे का वसतकार हे करत आहेत.

Related posts

आठवडी बाजार नूतनीकरणाचे काम बंद करण्याची रहिवाशी व व्यावसायिकांची मागणी

nirbhid swarajya

भरधाव दुचाकीची पोलला जोरदार धडक; एकाचा मृत्यु

nirbhid swarajya

सर्जा-राजाचा सण ‘बैलपोळा’…लासुरा बु येथील जवंजाळ परीवाराचा पोळा ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात

nirbhid swarajya
error: Content is protected !!