April 19, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 294 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 52 पॉझिटिव्ह

53 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 346 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 294 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 32 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 52 तर रॅपिड टेस्टमधील 242 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 294 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2 महिला, 2 पुरूष, मोताळा : 2 महिला, 1 पुरूष, खामगांव : इंदिरा नगर 1 पुरूष, 1 महिला, देशमुख प्लॉट 1 पुरूष, 1 महिला, सिंधी कॉलनी 1 पुरूष, 1 महिला, गांधी चौक 1 पुरूष, सती फैल 1 पुरूष, 1 महिला, रेखा प्लॉट 1 पुरूष, 2 महिला, शिवाजी नगर 1 पुरूष, 1 महिला, दे. राजा : 6 पुरूष, 1 महिला, बोराखेडी बावरा ता. दे.राजा : 6 महिला, 5 पुरूष, खरबडी ता. मोताळा: 1 पुरूष, 1 महिला, साखरखेर्डा ता. सिं.राजा : 4 महिला, 3 पुरूष, गोतमारा ता. मोताळा : 3 पुरूष, नांदुरा : विठ्ठल मंदीराजवळ 1 पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 52 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 53 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा: 1 महिला, दे.राजा : 1 पुरूष, 1 महिला, चांदेश्वरी मंदीराजवळ 3 महिला, 1 पुरूष, अमडापूर ता. चिखली : 1 पुरूष, दाताळा ता. मलकापूर : 1 महिला, जळगांव जामोद : 2 महिला, 1 पुरूष, नांदुरा : 1 पुरूष, तेलीपुरा 2 पुरूष, आनंद चौक 4 पुरूष, 4 महिला, दरबार गल्ली 1 पुरूष, 1 महिला, गायत्री नगर 1 महिला, 1 पुरूष, चांदूर बिस्वा ता. नांदुरा : 6 महिला, 3 पुरूष, धानोरा खुर्द ता. नांदुरा : 1 महिला, अंचरवाडी ता. चिखली : 1 पुरूष, खामगांव : 1 पुरूष, फरशी 1 पुरूष, बालाजी प्लॉट 4 महिला, 3 पुरूष, लक्कडगंज 1 महिला, 1 पुरूष, माटरगांव ता. शेगांव : 1 पुरूष.
तसेच आजपर्यंत 10262 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 940 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 940 आहे.
आज रोजी 123 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 10262 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1539 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 940 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 569 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 30 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे ३ जण ताब्यात

nirbhid swarajya

एक पोस्ट फक्त………. “कोरोना” नाहीच म्हणणाऱ्यांसाठी…..

nirbhid swarajya

अखिल भारतीय कलाल महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश चौकसे यांची नियुक्ती …

nirbhid swarajya
error: Content is protected !!